14 July 2020 6:22 PM
अँप डाउनलोड

SaveAarey: आदित्य ठाकरे नाही; ते तर 'पप्पू ठाकरे' आहेत: आपच्या नेत्या प्रीती शर्मा

Preeti Sharma Menon, Aap Party, Save Aarey, SaveAarey, AadityaThackeray, Aditya Thackeray, Shivsena, Yuvasena, Metro 3 Car Shade

मुंबई: आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेड डेपोवरून सध्या मुंबई शहरातील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर आणि पर्यावरणप्रेमी वृक्षतोडीविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत. त्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेत, राज्यात, दिल्लीत सत्ता असताना केवळ दाखवण्यापुरता विरोध केला जातं असल्याचा आरोप यापूर्वी देखील विरोधकांनी केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, यामध्ये आपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील याबाबत शिवसेनेला लक्ष केलं आहे. यावर बोलताना आपच्या नेत्या प्रीती शर्मा यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. आरे मी,मेट्रो कारशेडबाबत बोलताना प्रीती शर्मा यांनी आदित्य ठाकरेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे जे बोलतात ते करत नाहीत, त्यांचं बोलणं आणि कृती यांचा एकमेकांशी काही संबंध नसतो असं ट्विट मेनन यांनी केलं.

दरम्यान, पुढे त्यांनी टीकास्त्र करताना आदित्य ठाकरे यांना थेट ‘पप्पू ठाकरे’ असं म्हटलं आहे. त्यामुळे प्रीती शर्मा यांच्या टीकेला आता शिवसेना कसं प्रतिउत्तर देणार ते पाहावं लागणार आहे. अनेक प्रसार माध्यमांवर त्यांनी जाहीर प्रतिक्रिया नोंदवत आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x