6 May 2024 6:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Alert | उद्यापासून राज्यात लागू होणार कठोर निर्बंध | काय सुरू आणि काय बंद सविस्तर घ्या जाणून

Delta Plus Corona pandemic

मुंबई, २७ जून | राज्यात कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंट्समुळे 4 ते 6 आठवड्यांत तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता संपूर्ण राज्यात किमान तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू राहतील. 4 जूनला अनलॉकबाबत 5 टप्पेनिहाय नियमावली जारी करण्यात आली होती. त्यातील तिसऱ्या टप्याचे निर्बंध राज्यात लागू राहतील. उद्यापासून हे नवीन निर्बंध लागू राहणार आहेत.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश जारी केले. यानुसार सर्व प्रशासकीय क्षेत्रांत साप्ताहिक पॉझिटिव्हिटी निर्देशांक व ऑक्सिजन सुविधायुक्त खाटांची टक्केवारी कितीही असली तरी त्यांनी बंधनांचा स्तर, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांकडून स्पष्ट आदेशान्वये जोवर बंधने मागे घेतली जात नाहीत तोवर तिसऱ्या स्तराइतका ठेवावा. जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार असतील. निर्बंधात घट-किंवा वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर टेस्टचा पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घ्यावा लागेल.

४ जूनच्या आदेशामधील तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध असे:

* अत्यावश्यक दुकाने व सेवा रोज सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत खुली राहतील.
* मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील.
* सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील.
* माॅर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंगला पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मुभा असेल.
* खासगी आणि शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू असतील.
* लग्नसोहळ्यांना ५० लाेकांची, तर अंत्यविधीला २० लोकांची मर्यादा असेल.
* ई-कॉमर्स दुपारी २ पर्यंत सुरू असेल.
* जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहणार आहे.
* डेल्टा प्लस व तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे नियमांत केला बदल
* इतर दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंत खुली, शनिवार-रविवार मात्र बंद

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Delta Plus Corona pandemic third wave Maharashtra strict restrictions will be imposed from tomorrow news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x