27 July 2024 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या

OnePlus Nord CE 4 Lite

OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लस सध्या एका नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे. कंपनीच्या या आगामी फोनचे नाव वनप्लस Nord CE 4 Lite असे आहे. फोनच्या लाँचिंग डेटबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, BIS अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सवर हे दिसून आले आहे. या लिस्टिंगवरून हा फोन भारतातही लाँच होणार असल्याची पुष्टी झाली आहे. टिप्सटर संजू चौधरी यांनी हा फोन BIS वर पाहिला आहे.

लिस्टिंगनुसार फोनचा मॉडेल नंबर CPH2619 आहे. हा डिव्हाइस वनप्लस नॉर्ड सीई 4 लाइट सारखाच असल्याचा दावा केला जात आहे. लिस्टिंगमध्ये फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन ओप्पो A3 चे रिब्रँडेड व्हर्जन म्हणून जागतिक बाजारात दाखल होऊ शकतो, असे टिप्सटरचे म्हणणे आहे.

या फीचर्ससह येऊ शकतो फोन
टिप्सटरच्या म्हणण्यानुसार, कंपनी फोनमध्ये नॉर्ड CE 3 लाइटपेक्षा बरेच चांगले फीचर्स देणार आहे. फोनमध्ये तुम्हाला एक उत्तम AMOLED पॅनेल पाहायला मिळेल. याचा आकार 6.67 इंच असू शकतो. हा डिस्प्ले फुल एचडी+ रिझोल्यूशनसह येईल आणि तो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. कंपनी हा फोन 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायासह लाँच करू शकते. प्रोसेसर म्हणून यात स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट पाहायला मिळेल.

फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देऊ शकते. यामध्ये 2 मेगापिक्सलसेकंडरी लेन्ससह 50 मेगापिक्सलचा मेन लेन्स असू शकतो. तर सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देणार आहे. फोनची बॅटरी 5500mAh ची असू शकते, जी 33 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ओएसबद्दल बोलायचे झाले तर फोन लेटेस्ट OxygenOS वर काम करेल. याची किंमत सुमारे 25 हजार रुपये असू शकते.

News Title : OnePlus Nord CE 4 Lite Price in India check details 05 May 2024.

हॅशटॅग्स

#OnePlus Nord CE 4 Lite(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x