27 April 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
x

भूकंप नव्हे! 100 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ED च्या धाडसत्रात अडकलेले बाबा सिद्दीकी अजित पवार गटात 'पावन' होणार

Baba Siddique Resigned

Baba Siddique Resigned | महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्याबाबतच्या एका बातमीमुळे ED पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडली आहे. ते अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेनुसार अखेर बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आता १० फेब्रुवारी रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत.

दरम्यान, ३१ डिसेंबर २०१७ रोजी मुंबईतील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईतील निवासस्थानासहीत विविध कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली होती. वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात बाबा सिद्दीकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर रफीक मकबूल कुरेशी यांचा हात असल्याचा आरोप आहे. त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरच ईडीनं ही कारवाई केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी ईडीने एकूण 6 ठिकाणांवर छापेमारी केली होती. वांद्रे येथील झोपडपट्टी विकासाच्या नावाखाली सुमारे 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बाबा सिद्दीकी आणि रफीक कुरेशी यांच्यावर आहे. बनावट दस्तऐवज बनवून हा घोटाळा केल्याची माहिती पुढे आली होती. त्यादिवसापासून ईडीच्या कारवाईमुळे बाबा सिद्दीकी भाजपच्या संपर्कात आले होते.

मात्र जनतेच्या नजरेत येऊ नये म्हणून भाजपने त्यांना थेट प्रवेश न देता, ED कारवाईच्या भीतीने भाजपचा सहकारी झालेल्या अजित पवार गटात सामील होण्याचा सल्ला दिल्याची माहित पुढे आली आहे. बाबा सिद्दीकी यांचा अजित पवार गटातील प्रवेश हा भाजपच्या सल्ल्याने झाल्याचं भाजपच्या अंतर्गत गोटातील नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे आता घोटाळ्याचा आरोप असलेले बाबा सिद्दीकी सुद्धा आता पावन झाल्याचं म्हटलं जातंय.

News Title : Baba Siddique Resigned from congress party before joining Ajit Pawar camp 08 February 2024.

हॅशटॅग्स

#Baba Siddique Resigned(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x