26 October 2021 4:59 AM
अँप डाउनलोड

पंतप्रधानांच्या भेटीसाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना अटक

पुणे : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. केरळमधील शबरीमाला मंदिर प्रकरणी आणि महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असताना सुद्धा महिलांना प्रवेश दिला जात नाही. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीला निघाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साईबाबा समाधी शताब्दी उत्सवासाठी नगरजिल्ह्यात म्हणजे शिर्डीला येणार आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तृप्ती देसाई पुण्यातून निघाल्या असतानाच त्यांना पुणे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणाऱ्या मोदींना जाब विचारण्यास तृप्ती देसाई पुण्याहून शिर्डीला निघाल्या होत्या. यासाठी त्यांनी काल त्यांनी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र देखील दिलं होतं. त्यानंतर त्यासंबंधित सर्व माहिती अहमदनगरमधील पोलिस अधीक्षकांनी पुणे पोलिसांना दिली. अखेर त्यामुळे तृप्ती देसाई यांना घराजवळूनच अटक करण्यात आलं आहे. भेट न दिल्यास पंतप्रधानांचा ताफा अडवण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1656)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x