26 April 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

दरेकर! महिलांची माफी मागा | अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड रंगवू शकतो - रुपाली चाकणकर

NCP leader Rupali Chakankar

पुणे, १४ सप्टेंबर | महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा लवकरच राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन भाजप नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टिपण्णी केली होती. त्यावरुन, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांना इशारा दिला आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

प्रवीण दरेकर! महिलांची माफी मागा, अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड रंगवू शकतो – NCP leader Rupali Chakankar slams opposition leader Pravin Darekar over indirect statement regarding Surekha Punekar :

रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, त्यांनी प्रवीण दरेकर यांना स्पष्ट इशारा दिलाय. दरेकर यांनी पुण्यात शिरूर येथील क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त टिपण्णी केली होती. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरिबांकडे पाहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष’ असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते. तसेच, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतून संताप व्यक्त केला जात आहे.

प्रविण दरेकरजी, आपण विरोधी पक्षनेते आहात, विधानसभेच्या वरच्या सभागृहाचे नेते आहात, अभ्यासू आणि वैचारिकता असलेलं हे सभागृह आहे. मात्र, आपल्या वक्तव्यामुळे अभ्यासाचा आणि वैचारिकतेचा आपल्याशी दूरदूरपर्यंत संबंध नसल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले. तसेच, आपल्या बोलण्यातून जी घाण टपकतेय, ती आपल्या वैचारिकतेची दरिद्रता दाखवतेय. ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. आपल्या पक्षाच्या काही नेत्या आहेत. बाहेर फिरताना आपण किती महिलांच्या कैवारी आहोत हे दाखवून देत आहेत. आज मला त्यांची किव येत आहे. अशा महिला ज्या पक्षात काम करत आहेत, त्या पक्षाचा हा विचार आहे. तुमच्या बोलण्यावरुन तुमची संस्कृती काय आहे ती समजली. प्रविण दरेकर ज्या प्रकराचे आपण वक्तव्य केलंय त्याबद्दल आपण महिलांची माफी मागा अन्यथा राष्ट्रवादी महिला आघाडी, महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवू शकतो याची जाणीव आपण ठेवावी, असा थेट इशाराच चाकणकर यांनी दिला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP leader Rupali Chakankar slams opposition leader Pravin Darekar over indirect statement regarding Surekha Punekar.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x