23 September 2021 2:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

दारूड्या मुलांना मुली पटतात | मला लाईनही देत नाहीत, लै जीव जळतो | कार्यकर्त्याचे आमदाराला पत्र

MLA Subhash Dhote

चंद्रपूर, १४ सप्टेंबर | आमदारांना कोणती कामे सांगावीत याचेही एक तारतम्य असते. पण एका प्रेमवेड्या तरुणाने मुलगी पटत नाही म्हणून चक्क आमदारांना पत्र लिहिले. मुलींनी मुलांना भाव द्यावा यासाठी मुलींना प्रोत्साहन द्यावे, अशी अजब मागणी त्याने या पत्रातून केली आहे. हे पत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एकही मुलगी भाव देत नाही म्हणून भूषण जांबुवंत राठोड याने राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहिले. तो म्हणतो, ‘आपल्याला मुलगी पटून नाही राहिली ही चिंतेची बाब आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दारूड्या मुलांना मुली पटतात, मला लाईनही देत नाहीत, लै जीव जळतो, कार्यकर्त्याचे आमदाराला पत्र – Chandrapur activists wrote a letter to MLA Subhash Dhote over not getting girlfriend :

मुलगी पटवण्यासाठी मी दररोज राजुरा ते गडचांदूर जाणे-येणे करतो. तरीही आजवर एकाही मुलीने मला भाव दिला नाही, अशीही त्याला खंत आहे. पत्रात हा तरुण लिहितो की, दारू विकणाऱ्या आणि काळ्या रंगाच्या पोरांनाही गर्लफ्रेंड आहेत, हे बघून माझा जीव जळून राख होत आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघातील मुलींना आपण प्रोत्साहित करावे, जेणेकरून मुली मला भाव देतील,’ असा भूषण राठोड याने आमदार धोटेंकडे आग्रह धरला आहे. हा भूषण राठोड कोणत्या गावातील आहे हे अद्याप कळलेले नाही.

त्याचे दुःख जाणून घेऊन नक्की मदत करेन : आमदार सुभाष धोटे
राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे म्हणाले, माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील एका अतिउत्साही तरुण कार्यकर्त्याने मला पत्र लिहिले. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण हा तरुण अद्याप मला भेटला नाही. तो मला येऊन भेटला तर आमदार म्हणून त्याला काय दुःख आहे हे जाणून घेऊन त्याला नक्की मदत करू. पण पत्र लिहून परस्पर सोशल मीडियावर व्हायरल करणे हे मला बरोबर वाटत नाही.

MLA-Subhash-Dhote-Chandrapur

निव्वळ पब्लिसिटी स्टंट?
विशेष म्हणजे या तरुणाने हे पत्र थेट सुभाष धोटे यांना पोस्टाद्वारे किंवा मोबाईलवर पाठविले नाही. हे पत्र व्हायरल झाल्यावर धोटे यांच्या कार्यकर्त्यानेच त्यांना हे फॉरवर्ड केलं. हा प्रकार आमदार धोटे यांना फारसा रुचला नाही. त्यांनी ह्या तरुणाला थेट भेट घेण्याचे आवाहन केले. ‘जर मी स्वतः या तरुणाला भेटलो तर त्याची अडचण जाणून घेऊ शकेन. तसेच त्याचा योग्य तोडगा काढू शकेन. यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील या तरुणाचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्क करण्याचे सांगितले. मात्र, ह्या नावाचा तरुण अजून समोर आला नाही किंवा कुणाला अजून भेटला नाही. त्यामुळे हे खरे पत्र आहे की निव्वळ पब्लिसिटी स्टंट हे कळायला मार्ग नाही.

यापूर्वी देखील:
राजुरा तालुक्यात अशाच पद्धतीने एका योजनेचे लाभार्थी म्हणून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाचे प्रमाणपत्र काढले होते. हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट होता. या प्रकारात असाच खोडसाळपणा होण्याची शक्यता आहे. त्यावर आमदार सुभाष धोटे यांनी सावध पवित्रा घेत पत्र लिहिणाऱ्या युवकाला आमंत्रित केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Chandrapur activists wrote a letter to MLA Subhash Dhote over not getting girlfriend.

हॅशटॅग्स

#Politics(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x