23 September 2021 1:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

राजकीय टीका करण्याच्या नादात दरेकरांकडून महाराष्ट्राच्या लोककलाकारांचा अपमान? | प्रतिक्रियेत संतापजनक शब्दप्रयोग

BJP leader Pravin Darekar

पुणे, १४ सप्टेंबर | राष्ट्रवादी काँग्रेस आणि भापजमध्ये गेल्या काही दिवसापासून शाब्दीक खडाजंगी सुरु आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. पुणेकर या 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करण्याच्या नादात धक्कादायक विधान केलं आहे..

BhagyaVivah Marathi Matrimonial

राजकीय टीका करण्याच्या नादात दरेकरांकडून महाराष्ट्राच्या लोककलाकारांचा अपमान?, काय म्हणाले? – BJP leader Pravin Darekar indirectly made insult of Maharashtra Lok Kalakar at Pune :

दरेकरांनी या पक्ष प्रवेशावरुन ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणार पक्ष असल्याचे म्हटले आहे.’ ते पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळाव्याप्रसंगी बोलत होते. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ते पुढे म्हणाले की, “हा पक्ष सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष असल्याने गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

लावणी ही महाराष्ट्राची लोकप्रिय लोककला. मात्र राजकीय टीका टिपणीच्या नादात महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यानेच महाराष्ट्राच्या लोककलाकारांचा अपमान केला आहे अशी टीका समाज माध्यमांवर उमटू लागल्या आहेत. त्याला कारण ठरलं लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणार पक्ष असल्याचे दरेकरांनी म्हटले. राष्ट्रवादीकडूनही जळजळीत टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Pravin Darekar indirectly made insult of Maharashtra Lok Kalakar at Pune.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x