28 March 2024 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर?
x

प्रत्येक गोष्ट 'लीक' आहे , कारण चौकीदार 'वीक' आहे : राहुल

नवी दिल्ली : देशभरात सध्या सगळंच लीक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. डेटा लीक, आधार लीक, एसएससी पेपर लीक, सीबीएसई पेपर लीक आणि निवडणूक तारीख लीक असा संदर्भ जोडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान अकार्यक्षम असल्याचा टोला मोदींना ट्विट करून लगावला आहे.

भारतात प्रत्येक गोष्ट ‘लीक’ होत आहे, कारण देशाचा चौकीदार ‘वीक’ आहे असं अनेक उदाहरणं देत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. त्यांचं हे बोचरी टीका करणार ट्विट भाजपच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. कालच प्रकाश जावडेकरांनी सीबीएसई परीक्षेतील दोन पेपर फुटल्यामुळे फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतर पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आणि विद्यार्थ्यांनी जंतरमंतर येथे विरोध प्रदर्शन केलं.

त्यालाच अनुसरून राहुल गांधी यांनी काही उदाहरणं देत सूचक आणि मार्मिक टीका केली आहे. भारतात प्रत्येक गोष्ट लीक होत आहे, कारण देशाचा चौकीदार वीक आहे असं अनेक उदाहरणं देत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. डेटा लीक, आधार लीक, एसएससी पेपर लीक, सीबीएसई पेपर लीक आणि निवडणूक तारीख लीक असा संदर्भ जोडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान अकार्यक्षम असल्याचा टोला मोदींना ट्विट करून लगावला आहे.

परंतु ही बोचरी टीका करताना त्या ट्विटसोबतच ‘#बसएकऔरसाल’ असं हॅशटॅग केल्याने ते भाजपच्या चांगलच जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.

काय आहे ट्विट नेमकं,

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x