23 April 2024 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

दिशाला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं | न्यायाधीशांसमोर तिचे डोळे भरून आले

Greta Thunberg, farm protest, toolkit Edit, Disha Ravi

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी: दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी बंगळुरुतून 21 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीला अटक केले आहे. फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक असून, तिच्यावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टुलकिट एडिट केल्याचा आरोप आहे.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग कथित ‘टूलकिट’ ट्विट केलं होतं. या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हाही दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्याच्या दहा दिवसानंतर पोलिसांनी बंगळुरूतील दिशा रवी या पर्यावरण कार्यकर्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर अटक केली.

दरम्यान, अटक करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दिशाला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर केलं. न्यायाधीश देव सरोहा यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्यायालयात बोलताना दिशाचे डोळे भरून आले. ती म्हणाली,”आपण कोणत्याही कटात वा गटामध्ये सहभागी नाही. मी फक्त शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहे… कारण ते आपलं भविष्य आहेत. आपल्या अन्नाची गरज आहे आणि शेतकरीच आहेत जे आपल्याला अन्न पुरवतात. आपण कोणतीही टूलकिट तयार केली नव्हती. त्या कागदपत्रामध्ये आपण फक्त दोन बदल केले होते,” असं दिशाने न्यायालयाला सांगितलं.

 

News English Summary: The Delhi Police Cyber Cell on Saturday arrested 21-year-old climate activist Disha Ravi from Bangalore. One of the founders of the Friday for Future campaign is accused of editing a toolkit related to the peasant movement.

News English Title: Greta Thunberg farm protest toolkit Disha Ravi Broke down during the hearing news updates.

हॅशटॅग्स

#india(222)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x