27 July 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

अम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा

West Bengal, Cyclone Amphan, Prime Minister Narendra Modi

बशीरहाट (कोलकाता), २२ मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील अम्फान वादळामुळे झालेल्या नुकसानीचं हवाई सर्वेक्षण केलं. केंद्राच्या वतीने त्यांनी बंगालला १ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. चक्रीवादळामुळे झालं नुकसान भरून निघून बंगाल पुन्हा उदयास येईल अशी त्यांना आशा आहे. पीएम मोदी म्हणाले की, या दु: खाच्या घटनेत ते पश्चिम बंगालसोबत आहेत. बंगालवर कोरोना आणि अम्फान या दोन्ही आपत्तींशी एकत्र लढत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज पश्चिम बंगालचा दौरा केला. यावेळी त्यांनी या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी केली. तसंच पश्चिम बंगालला १ हजार कोटी रूपयांची तर मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख आणि गंभीररित्या जखमी झालेल्या लोकांना १ लाख रूपयांची तात्काळ मदत जाहीर केली. दरम्यान, केंद्र सरकारची एक टीम पश्चिम बंगलच्या दौऱ्यावर जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही टीम त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करेल आणि राज्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची मदत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या दौऱ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील त्यांच्यासोबत होत्या. दोघांनी हेलिकॉप्टरच्या मदतीनं हवाई पाहणी केली. अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ८० जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशाचा दौराही करणार आहेत.

यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चक्रीवादळामुळे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न केले. तरीही आम्ही ८० जणांना वाचवू शकलो नाही. याचे दु:ख आहे. शेती, वीज आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आता आम्हाला त्यांची मदत करायची आहे. दोन्ही सरकारे मिळून मदत करणार असल्याचे मोदी म्हणाले.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi on Friday conducted an aerial survey of the damage caused by Hurricane Amphan in West Bengal. On behalf of the Center, it has announced Rs 1,000 crore aid to Bengal.

News English Title: Rs 1000 Crore Allocated By Central Government For Immediate Assistance Of West Bengal In The Wake Of Cyclone Amphan Prime Minister Narendra Modi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x