6 December 2024 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सहित 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
x

CBI ला राजस्थानची दारं बंद होताच, अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीचा छापा

Rajasthan CM Ashok Gehlot, Ed In Fertiliser Scam, sachin Pilot

जयपूर २२ जुलै: राजस्थानमधल्या सत्तेच्या राजकीय नाट्याला वेगळं वळण मिळालं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा निर्णय घेत केंद्राच्या आधीन असलेल्या CBIला राजस्थानची दारं बंद केली आहेत. आता राज्य सरकारच्या परवानगी शिवाय CBIला राज्यात कुठल्याही प्रकारचा तपास करता येणार नाही. सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर अशोक गेहलोत यांची खुर्ची डळमळीत झाली असून या काळात केंद्र सरकार CBIचा वापर करून आपल्याला धक्का देऊ शकते अशी शक्यता वाटल्यानेच गेहलोत यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे.

या आधीचा राज्य आणि केंद्र सरकारदरम्यान झालेला करार रद्द करण्यात आला आहे. आता सरकारने नवीन आदेश काढले असून त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार आमने-सामने आलं आहे. राज्याल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाने मागितल्याने राज्य सरकार खडबडून जागं झालं असून त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. तर राज्यात सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांवर आयकर विभागाने छापेही टाकले होते. त्यावरूनही केंद्र सरकारवर काँग्रेसने टीका केली होती.

दरम्यान, राजस्थानमध्ये राजकीय सत्तासंघर्ष सुरु असतानाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. कथित खत घोटाळा प्रकरणी ईडीकडून हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून बुधवारी सकाळी घोटाळ्या प्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यामध्ये अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीचाही समावेश आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ईडीकडून जोधपूरमधील अनुपम कृषी कंपनीवर छापा टाकण्यात आला आहे. ही कंपनी अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या मालकीची आहे. कस्टम विभागाने खटला चालवत कंपनीवर सात कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. ईडीकडून राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

 

News English Summary: The company of Chief Minister Ashok Gehlot’s brother has been raided by the ED as political power struggles are raging in Rajasthan. The raid was carried out by the ED in connection with the alleged fertilizer scam. The ED is conducting raids at various places on Wednesday morning in connection with the scam.

News English Title: Rajasthan CM Ashok Gehlots Brother Raided By Ed In Fertiliser Scam News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SachinPilot(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x