2 May 2024 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Health First | च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे | नक्की वाचा

Chyawanprash benefits in Marathi

मुंबई, ०७ जुलै | आपल्यातील अनेक जन आपल्या लहानपणा पासून च्यवनप्राश खात असतील,किंवा आता खायला सुरवात करणार असतील. साधारणपणे २५ आयुर्वेदिक घटक एकत्र करून तयार केले जाणारे हे च्यवनप्राश खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. अनेकदा आपल्या मित्र – मैत्रिणींकडून किंवा वडीलधार्‍यांकडून सर्दी खोकला झाल्यावर किंवा अशक्तपणा आल्यावर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. याच च्यवनप्राश संबंधित सर्व माहिती या लेखात दिलेली आहे.

अशा या गुणकारी आणि सर्वश्रूत असणार्‍या च्यवनप्राश खाण्याचे फायदे व तोटे, च्यवनप्राश कसे खावे,च्यवनप्राश खाण्याच्या आधी कोणती काळजी घ्यावी तसेच सर्वोत्तम च्यवनप्राश कोणकोणते आहेत. ही सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केलेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात च्यवनप्राश ची सर्व माहिती.

च्यवनप्राश खाण्याचे १० फायदे:
१) रक्त शुद्ध करण्यास च्यवनप्राश मदत करते:
तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी च्यवनप्राश फायदेशीर आहे,दिवसातून १ वेळा च्यवनप्राश खाल्याने तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होते व तुमचे शरीर सदृढ रहण्यास मदत होते.

२) हाडांना मजबूत करण्यासाठी च्यवनप्राश गुणकारी:
च्यवनप्राश खाण्याच्या असंख्य फायद्यांपैकी हा देखील एक फायदा आहे. हाडांना मजबूत करण्यासाठी च्यवनप्राश चे दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तुमच्या हाडां मधील प्रोटीन व कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. काहींना हाडांच्या संबंधित आजार असतील जसे की संधिवात, अशांना डॉक्टर रोज च्यवनप्राश खाण्याचा सल्ला देतात. आणि त्यांनी च्यवनप्राश दुधासोबत खाल्यास अधिक गुणकारी ठरते.

३) हृदयाच्या मजबुती साठी फायदेशीर:
हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे,आणि अशा या हृदयाचे स्वास्थ जपणे आपल्याला जमलेच पाहिजे. आणि च्यवनप्राश खाल्ल्याने हृदयाच्या रक्त पुरवठा करणार्‍या नसांना स्वच्छ तर करतेच व मजबूत देखील बनवते. याखेरीस च्यवनप्राश तुमचे हार्ट बीट देखील नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्यामुळे ज्यांना हृदय विकाराचा त्रास होत असेल अश्याना दिवसातून किमान एकदा च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो.

४) त्वचा चमकदार बनवते:
हवामानातील बदल, प्रदूषण व बदलत्या ऋतूंमुळे देखील तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होत असतात,जसे की त्वचा कोरडी पडणे, किंवा तरुण पणीच काहींच्या चेहर्‍यावर सुरकुत्या दिसायला लागतात. अशा सर्वांना च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. चवनप्राश खाल्याने तुमच्या त्वचेचे आरोग्य उत्तम राहते व त्वचा मुलायम आणि चमकदार दिसायला लागते. त्यामुळे चेहरा उजळवण्यासाठी इतर क्रीम वापरण्याबरोबरच दररोज सकाळी एक चमचा च्यवनप्राश देखील खा तुमचा चेहरा उजळून निघेल.

५) मेंदू साठी देखील च्यवनप्राश फायदेशीर:
च्यवनप्राश खाल्याने स्मरणशक्ती वाढते च्यवनप्राश मध्ये अॅंटी -ओक्सिडेंट असतात जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्याच बरोबर काहींना मेंदूचे आजार असतात, अश्यांना देखील च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शारीरिक फायद्यांसोबत मानसिक संतुलन राखण्यास देखील च्यवनप्राश फायदेशीर आहे.

६) रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते:
च्यवनप्राश चा आणखी एक गुणधर्म म्हणजे दैनंदिन च्यवनप्राशच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. कोणत्याही रोगांना किंवा आजारांना विरोध करणारी अशी ही प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दररोज किमान एकदा तरी च्यवनप्राश खाणे चांगले. तुमची रोग प्रतिकार शक्ती उत्तम असल्यास साथीच्या आजारांमध्ये तुम्हाला अशा आजारांपासून वाचण्यासाठी निच्छित फायदा होईल.

७) रक्तातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण नियंत्रनात ठेवण्यास गुणकारी:
तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढल्यावर हार्ट अटॅक सारखे परिणाम होतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी असणे फार गरजेचे आहे. आणि हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचे काम च्यवनप्राश करते. त्यामुळे नियमित च्यवनप्राश खाल्याने हार्ट अटॅक सारख्या आजरांपासून तुम्ही दूर राहू शकता.

८) श्वसनाच्या आजारांमध्ये च्यवनप्राश उपयोगी:
सहसा काही म्हातार्‍या माणसांमध्ये श्वसनाचे त्रास असतात, आणि अशा सर्वांना डॉक्टर देखील दिवसातून किमान एक चमचा च्यवनप्राश कोमट पाण्यासोबत घेण्याचा सल्ला देतात. परंतु ज्यांना श्वसनाचे विकार आहेत किंवा त्रास होत असतो अशांनी दूध व दही खाणे टाळावे.

९) वजन कमी करण्यासाठी देखील च्यवनप्राश चा वापर:
ज्यांचे वजन वाढले आहे परंतु त्यांना ते नियंत्रणात आणायचे आहे अश्यांनी देखील रोज च्यवनप्राश चे सेवण केले पाहिजे. च्यवनप्राश च्या सेवनासोबतच नियमित व्यायाम आणि आहाराच्या बाबतीतील योग्य डायट प्लान अंगिकारल्यास तुमचे वजन नक्कीच लवकर कमी होईल.

१०) पचन प्रक्रिया सुधारते:
काहींना पचनाचे आजार असतात, अशा सर्वांसाठी च्यवनप्राश मध्ये असलेले तेजपत्ता व दालचीनी मुळे त्यांना पचनाच्या विकारांपासून आराम मिळतो. नियमित च्यवनप्राश खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते व अन्न व्यवस्थित पचून तुमची पचनशक्ती वाढते. दिवसातून सकाळी किमान एकदा च्यवनप्राश खाल्ल्याने तुमची पचनाच्या विकारांपासून मुक्ती होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Article Disclaimer: आरोग्य विषयक आर्टिकलमध्ये दिलेले उपाय हे सामान्य मार्गदर्शन आणि माहिती आहे. याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

News Title: Healthy Chyawanprash benefits in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x