27 July 2024 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Lok Sabha Election 2024 | गुजरातमध्येही भाजप उमेदवारांना पराभवाची भीती, दोन उमेदवारांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला दुहेरी धक्का बसला आहे. दिवसभरात भाजपच्या दोन उमेदवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय अचानक जाहीर केला आहे. गुजरातच्या वडोदरा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रंजन भट्ट यांनी सकाळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

आता गुजरातमधील साबरकांठा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारानेही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही उमेदवारांनी निवडणूक न लढवण्याचे कारणही दिले आहे. प्रसार माध्यमं प्रसार माध्यमांच्या दबावाखाली काहीही दाखवत असली तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी अत्यंत अवघड असल्याचं जमिनीवरील वास्तव आहे, जे लपवलं जातंय, असं अनुभवी पत्रकार सांगत आहेत. अगदी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुजरातमध्ये पोहोचली होती, तेव्हा त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.

तसेच गुजरातमधील भाजपचे नेते सुद्धा मोदी-शहांच्या एकाधिकारशाहीला कंटाळ्याचे स्थानिक पत्रकार सांगत आहेत. परिणामी, जाहीर करण्यात आलेल्या लोकसभा उमेदवारांविरोधात भाजपच्या स्थानिक नेत्यांचा रोष प्रचंड वाढल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ देखील धास्तावले आहेत.

नुकतेच भाजपने साबरकांठा लोकसभा मतदारसंघातून भिकाजी ठाकोर यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. आता त्यांनीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातच्या वडोदरा मतदारसंघातील रंजन भट्ट यांनी ‘एक्स’वर लिहिले की, मी, रंजनबेन धनंजय भट्ट वैयक्तिक कारणास्तव लोकसभा निवडणूक 2024 लढवण्यास इच्छुक नाही.

त्यानंतर लगेचच साबरकांठा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार भिकाजी ठाकोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘इन्स्टाग्राम’वर निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले. ‘मी, भिकाजी ठाकोर, वैयक्तिक कारणास्तव साबरकांठा मधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही.

वडोदरा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्याच्या भाजपच्या निर्णयावर टीका करणारे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी भट्ट यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. बडोद्यातून तिसऱ्यांदा उमेदवार म्हणून भट्ट यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या उपाध्यक्ष ज्योतीबेन पंड्या यांनी पक्षआणि सर्व पदांचा राजीनामा दिला.

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर भट्ट विजयी झाले होते. 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकही जिंकली होती आणि आगामी निवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारीही दिली होती. गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागांसाठी एकाच टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या.

News Title : Lok Sabha Election 2024 Gujarat check details 23 March 2024.

हॅशटॅग्स

#Lok Sabha Election 2024(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x