19 October 2021 8:58 AM
अँप डाउनलोड

रॉबर्ट वढेरा मुरादाबादमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? पोस्टरबाजी

Priyanka Gandhi, Robert Vadra

मुरादाबाद : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. इतकंच नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर देखील मुरादाबाद युवा काँग्रेसकडून मुरादाबादच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तुमचं स्वागत आहे, अशाप्रकारचे पोस्टर येथे लावण्यात आले आहेत. मात्र, काँग्रेसकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत वृत्त काँग्रेसने प्रसिद्ध केलेलं नाही. परंतु, एक दिवसापूर्वीच खुद्द वढेरा यांनीच फेसबुक पोस्टद्वारे राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिल्याने आणि दुसऱ्याच दिवशी अशे पोस्टर मुरादाबादमध्ये दिसल्याने वढेरा निवढणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, रॉबर्ट यांच्या पत्नी प्रियंका गांधी-वढेरा यांनीही नुकताच राजकारणात प्रवेश केला असून त्यांच्यावर काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Congress(524)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x