वसई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलत नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. त्यापैकीच अजून एक मदतीचं प्रकरण वसई येथून समोर आलं आहे. तब्बल १२ मराठी तरुणांनी कष्टाचा पैसे वसईमध्ये स्वतःचे घर घेण्याच्या उद्देशाने एका प्रकल्पात गुंतवला होता.

परंतु, पैसे गुंतवून देखील बांधकाम अनेक वर्षांपासून जैसे थे होतं. दरम्यान, या तरुणांनी घर नाही, परंतु गुंतवलेला घामाचा पैसा तरी परत मिळावा म्हणून बांधकाम व्यावसायिकाकडे अनेकदा तगादा लावला. मात्र सदर तरुणांच्या सर्व मागण्या वारंवार दुर्लक्षित करण्यात येत होत्या. त्यामुळे कष्टाने कमवलेल्या पैशाचं तर पाणी झालं आणि ना स्वतःच्या हक्काची वास्तू देखील मिळाली. मात्र समाज माध्यमांवरील काही व्हिडिओ मार्फत संबंधित तरुणांनी पालघरचे मनसेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि थेट कॉल करून संपूर्ण विषयाची त्यांना माहिती करून दिली.

दरम्यान, तुम्हाला पुढच्या २४ तासाच्या आतमध्ये न्याय मिळेल असे आश्वासन तुलसी जोशी यांनी संबंधित मराठी तरुणांना दिलं. त्याप्रमाणे थेट बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात संबंधित तरुण पोहोचले आणि तुलसी जोशी यांना फोन जोडून दिला. त्यानंतर झालेल्या संभाषणाअंती बांधकाम व्यावसायिकाने सर्व तरुणांना त्यांचे रखडलेले धनादेश परत केले आणि या तरुणांनी राज ठाकरेंच्या पक्षाचे आणि तुलसी जोशींचे आभार मानून सुटकेचा निश्वास सोडला. संबंधित मराठी तरुणांनी तसा अधिकृत व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे.

MNS worker Tulsi Joshi from Palghar has given justice to marathi youngsters for getting their money back