14 December 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

IRCTC Platform Ticket Rules | आता रेल्वे प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकिटावर सुद्धा रेल्वे प्रवास करता येणार, नवा नियम जाणून घ्या

IRCTC Platform Ticket Rules

IRCTC Platform Ticket Rules | ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कधी अचानक प्रवास करावा लागला आणि तिकीट नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. आता तुम्हीही आरक्षणाच्या नियमांशिवाय प्रवास करू शकता. यापूर्वी तात्काळ तिकीट बुकिंग नियमांचा पर्याय होता, पण त्यातही तिकीट घेणं गरजेचं नाही. अशावेळी रेल्वेचा विशिष्ट नियम तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. या सुविधेअंतर्गत आता आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे.

प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करा :
रेल्वेच्या नियमानुसार तुम्हाला आरक्षण नसेल आणि तुम्हाला रेल्वेने कुठेतरी जायचं असेल, तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच ट्रेनमध्ये चढू शकता. तिकीट तपासनीसाकडे जाऊन तुम्ही अगदी सहज तिकीट बनवू शकता. हा नियम (भारतीय रेल्वे नियम) रेल्वेने बनवला आहे. त्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटासह तत्काळ टीटीईशी संपर्क साधावा लागेल. त्यानंतर टीटीई आपल्या डेस्टिनेशन स्थानाची तिकिट तुम्हाला देईल.

जागा रिकामी नसली तरी पर्याय आहे :
ट्रेनमध्ये सीट रिकामी नसेल तर टीटीई तुम्हाला आरक्षित सीट देण्यास नकार देऊ शकते. मात्र, तुम्ही प्रवास थांबवू शकत नाही. जर तुमच्याकडे आरक्षण नसेल तर प्रवाशाकडून प्रवासाचे एकूण भाडे 250 रुपये दंड आकारून त्याला तिकीट दिले जाईल.

प्लॅटफॉर्म तिकीट किंमत :
प्लॅटफॉर्म तिकिटामुळे प्रवाशाला ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार मिळतो. यासोबतच प्रवाशाने ज्या स्थानकावरून प्लॅटफॉर्म तिकीट घेतले आहे, त्याच स्थानकावरून भाडे द्यावे लागणार आहे. भाडे आकारताना डिपार्चर स्टेशनही तेच स्टेशन मानले जाईल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या क्लासमध्ये तुम्ही प्रवास करणार आहात त्याच वर्गाचे भाडेही तुम्हाला द्यावे लागेल.

तुमची सीट :
काही कारणाने तुमची गाडी चुकली, तर टीटीई पुढील दोन स्टेशनसाठी तुमची सीट कोणालाही देऊ शकत नाही. म्हणजे पुढच्या दोन स्टेशनवर ट्रेनच्या आधी पोहोचून तुम्ही तुमचा प्रवास पूर्ण करू शकता. मात्र, दोन स्टेशननंतर टीटीई आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशाला सीट देऊ शकते, हे लक्षात ठेवा. या काळात तुमच्याकडे दोन स्टेशन्सचा पर्याय आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IRCTC Platform Ticket Rules need to know check details 27 August 2022.

हॅशटॅग्स

#IRCTC Platform Ticket Rules(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x