26 May 2022 6:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

बिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान यांची शांततेची भाषा

Imran Khan, Pakistan

इस्लामाबाद : बिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान आणि पाकिस्तानची खुमखुमी कमी होताना दिसत आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते त्यामुळे पाकिस्तान सरकार खडबडून जागा झाला आहे आणि शांततेच्या बाता करू लागला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. तेव्हा मी पठाणचा मुलगा असून शब्द पाळणार असे म्हणाले होते. बघू आता काय करतात’ असे मोदी सभेत म्हणाले होते. त्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पंतप्रधान इम्रान खान आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्याचे ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करू. पंतप्रधान मोदींनी शांततेची एक संधी द्यावी असे त्यामध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x