20 June 2021 3:01 PM
अँप डाउनलोड

DRDO कोरोना औषध 2DG तयार | रुग्णांकडे लवकरात लवकर पोहोचविण्यापेक्षा लॉन्च इव्हेंटला महत्व

Anti corona drug 2DG

नवी दिल्ली, १७ मे | DRDO ने तयार केलेल्या अँटी कोरोना ड्रग 2DG चे 10,000 पॅकेट आज(दि.17) आपातकालीन वापरासाठी रुग्णांना दिले जातील. सदर इव्हेन्ट सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे औषधाची पहिली खेप रिलीज केली जाईल.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्री हर्षवर्धन रुग्णांना औषध देताना उपस्थित राहू शकतात. हे औषध पाउडर स्वरुपात आहे. दरम्यान पहिली १० हजार पाकिटांची खेप तयार असताना मोदी सरकारमधील मंत्री याला इव्हेंटचं स्वरूप देत असल्याचं पाहायला मिळतंय. लोकांना अत्यंत तातडीची गरज असताना केंद्र सरकारमधील मधील मंत्री वेळ वाया घालवत असल्याचं पाहायला मिळतंय. कोणत्याही औषधाचा परिणाम लगेच दिसत नाही. त्यामुळे ते जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर ते रुग्णांकडे पोहोचणं गरजेचं असल्याचं म्हटलं जातंय.

हे औषध DRDO च्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड साइंसेस (INMAS) ने डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजसोबत मिळून तयार केले आहे. क्लीनिकल रिसर्चदरम्यान 2-डीजी औषधाच्या 5.85 ग्रामचे पाउच तयार करण्यात आले. याचे एक-एक पाउच सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात मिसळून दिले जातात. याचे चांगली परिणाम दिसून आले आहेत. ज्या रुग्णांना हे औषध दिले, त्यांच्यात वेगाने रिकव्हरी होत आहे. या आधारावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाला परवानगी दिली आहे.

2DG हे औषध कोरोनाचा सामना करण्यात मोठ्या प्रमाणावर प्रभावी असल्याचे ट्रायलमधून समोर आले आहे. याच्या वापराने रुग्ण फार लवकर बरा होतो. हे एक प्रकारचे सूडो ग्लूकोज आहे. यामुळे व्हायरसची शरीरात पसरण्याची क्षमता कमी होते. हे औषध पावडर स्वरुपात असून ते सहजपणे पाण्यात विरघळून घेतले जाऊ शकते. कोरोनाच्या थैमानात रुग्णांसाठी हे औषध रामबाण सिद्ध होऊ शकते.

 

News English Summary: 10,000 packets of anti-corona drug 2DG manufactured by DRDO will be given to patients for emergency use today (17th). The first batch of the drug will be released through video conferencing at 10.30 am, according to Defense Minister Rajnath Singh’s social media account.

News English Title: Ten thousand packets of anti corona drug 2DG manufactured by DRDO will be given to patients for emergency use today news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1382)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x