13 December 2024 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

China on LAC | LAC वर चीन पुन्हा सक्रिय | ​​​​​​​लडाख सीमेवर 8 ठिकाणी लष्करी छावण्या | प्रत्येक ठिकाणी 84 तंबू

China LAC

नवी दिल्ली, २७ सप्टेंबर | भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सीमा वाद सुरु आहे. 17 महिन्यांपूर्वी पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतर पुन्हा एकदा चीन भारताच्या सीमेवर (China on LAC) सक्रिय झाला आहे. गुप्तचर अहवालानुसार, चीनने पूर्व लडाखच्या समोर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) जवळपास 8 ठिकाणी नवीन मॉड्यूलर कंटेनर तयार करत आहे. हे बंकर चीनी सैनिकांना राहण्यासाठी बांधले जात आहे.

China LAC Reactivates On Border, Tents Pitched On Ladakh Border, Military Camps In Eight Places, 84 Tents In Each Place :

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तरेकडील काराकोरम खिंडीजवळील वहाब जिल्गापासून पियू, हॉट स्प्रिंग्स, चांग ला, ताशीगोंग, मांजा आणि चुरूप पर्यंत सैनिकांसाठी आश्रयस्थान बांधले आहेत. या प्रत्येक ठिकाणी सात क्लस्टरमध्ये 80 ते 84 कंटेनर बनवले गेले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लष्करी चकमकीनंतर चीनने अनेक छावण्या उभारल्या आहेत. परंतु, सध्याच्या छावण्यावरुन चीनचा दीर्घकाळ सीमेवरून आपले सैन्य मागे घेण्याचा कोणताही हेतू नाही असे दिसून येत आहे.

सीमेवर दोन्ही देशांचे 50-50 हजार सैनिक तैनात:
भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस शिगेला पोहचत आहे. पूर्व लडाखजवळील सीमा रेषेवर दोन्ही देशांनी 50-50 हजार सैनिकांना तैनात केले आहे. विशेष म्हणजे दोन्ही देशांतील सैन्यांकडे हॉविट्झर्स, टँक आणि पृष्ठभागावरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहेत. या अस्वस्थ परिस्थितीत दोन्ही बाजूंचे सैन्य नियमितपणे बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लडाखपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत विस्तारलेल्या या प्रदेशात चीनने अनेक हवाई पट्ट्या आणि नवीन हेलिपॅड देखील बांधले आहेत. यासोबतच चीनने आपले प्रमुख हवाई तळ होतन, काशगर, गारगुन्सा, ल्हासा-गोंगगर आणि शिगत्से या हवाई तळांना सुधारित केले आहे.

गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लष्करी चकमकीनंतर चीनने अनेक छावण्या उभारल्या आहेत. जुन्या व्यतिरिक्त या नवीन छावण्या बांधण्यात आल्या आहेत. याचा अर्थ एकच आहे की चीनचा सीमेवरून सैन्य मागे घेण्याचा कोणताही हेतू नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: China on LAC peoples liberation army built more camp on LAC border.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x