14 December 2024 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक ६ हजार जमा करण्यासाठी ३ इव्हेन्ट द्वारे २ हजार

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi, PM Narendra Modi

बंगळुरू: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट खात्यात जमा केली जातो. मात्र सदर रक्कम एकाचवेळी न देता तीन हफ्त्यांमध्ये दिली जाते. त्यानुसार प्रत्येक हफ्त्याला २ हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्याला दिले जातात. शेतकऱ्यांसाठी ही रक्कम अल्प असली तरी मोदी सरकार वर्षाला ३ इव्हेन्ट आयोजित करून २००० हजार रुपये ट्रान्सफर करताना मोठी जाहिरातबाजी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही प्रसार माध्यमांनी एकाचवेळी ट्रान्सफर केली जाणारी रक्कम ११ हजार कोटी तर काहींनी ती १२ हजार कोटी असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मोदी सरकार कडून मार्केटिंग करताना देखील ताळमेळ नसल्याचं दिसत आहे.

कर्नाटकमधील तुमकूरमध्ये आयोजित एका समारंभात पंतप्रधान देशभरातील वर्षाकाठी २००० रुपयांचे ३ हप्ते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करणार आहेत. जवळपास ८ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान मोदी थेट २००० रूपयांचा पहिला हफ्ता जमा करणार आहेत. त्यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांना या आर्थिक वर्षात २००० रूपयांचा दुसरा हफ्ता जमा करण्यात येणार आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, आज जवळपास ११ हजार कोटी रूपये या शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यात येणार आहेत.

देशभरात अनेक ठिकाणी कापणीचा हंगाम सुरु होणार असून त्याआधी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याने फायदा होईल. आर्थिक वर्षातील हा तिसरा हफ्ता आहे. है पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा करताना लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यावेळी एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास २००० कोटी रुपये जमा करण्यात आले होते.

त्यात या आर्थिक वर्षात अपेक्षेप्रमाणे महसूल मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याने केंद्र सरकारने काटकसरीचे धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून सरकारी खर्चात कपात करण्यात येत असून, या तिमाहीत खर्चाची मर्यादा ३३ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेलं मोदी सरकार असेच छोट्या विषयातून इव्हेन्ट द्वारे स्वतःची पाठ थोपटून जाहिरातबाजीत व्यस्त राहील अशी शक्यता आहे.

 

Web Title:  Prime Minister Narendra Modi Karnataka visit Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Farmers Award.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x