21 November 2019 7:28 AM
अँप डाउनलोड

शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, या सरकारची नियत दिसत नाही

मुंबई : राज्यातलं सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अजिबात पाळत नाही. एकूणच ह्यांची कार्यपद्धती पाहता सरकारची नियत ठीक दिसत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी असं रोखठोक आवाहन माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना केलं आहे.

मी स्वतः शेतकरी असल्याने माझा साहजिकच शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. तसेच समाजातील सर्वच घटकांनी शेतकऱ्यांच्या संपला पाठिंबा द्यायला हवा असं सुद्धा शरद पवार यांनी मत व्यक्त केलं आहे.

तसेच पुढे शेतकऱ्यांना आवाहन करताना पवार म्हणाले की, शेतमालाची आणि दुधाची रस्त्यावर नासाडी न करता ते दूध गरिबांच्या वस्त्यांमध्ये वाटप करावे. त्यामुळे चांगले समाजकार्य घडेल आणि त्यामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाची सुद्धा नासाडी होणार नाही, अशी विनंती पूर्व सूचना सुद्धा शरद पवारांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केली.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(205)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या