14 December 2024 6:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

माझ्या आत्महत्येला मोदी सरकार जबाबदार म्हणत शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहिली होती | पण भाजपने...

farmer Suicide, Modi Govt, Suicide Note

यवतमाळ, ९ नोव्हेंबर: दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं जळगावात एका एस.टी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तत्पूर्वी माझ्या आत्महत्येला ST महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकलं. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी (९ नोव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करणाऱ्या ठाकरे सरकारने इथेही तोच न्याय लावून चौधरी यांच्या मृत्यूला कारणीभूत मानून राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना तात्काळ अटक करावी,’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

तत्पूर्वी, म्हणजे १० एप्रिल २०१८ रोजी तीन लाखाच्या कर्ज आणि नापिकीला कंटाळून नैराश्य आलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. परंतु त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट मध्ये ‘माझ्या आत्महत्येला सर्वस्वी नरेंद्र मोदी सरकार जबाबदार’ असल्याचा लिखित उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला होता.

शंकर भाऊराव चायरे असे या शेतकऱ्याचे नाव होते आणि त्यांनी ३ लाखाच्या कर्ज आणि नापिकीला कंटाळून नैराश्य आल्याने १० एप्रिल २०१८ रोजी आत्महत्या केली होती. परंतु आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एकूण ६ पाणी सुसाईड नोट लिहिली होती आणि त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला होता. आत्महत्याग्रस्त शेतकरी शंकर भाऊराव चायरे हे घाटंजी तालुक्यातील राजूरवाडीचे रहिवासी होते. त्यांनी प्रथम गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नं केला होता, परंतु ते त्यातून वाचले. पण त्यानंतर त्यांनी विष प्राशन केले आणि स्वतःचे आयुष्य संपवले होते. यवतमाळ मधील घाटंजी तालुक्यातील राजूरवाडीचे रहिवासी असलेले शंकर भाऊराव चायरे यांची एकूण ६ एकर शेती होती. त्यात ते कापूस आणि तूर हे पीक घ्यायचे परंतु ते सगळं पीक उध्वस्त झालं होते.

शंकर भाऊराव चायरे यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की:
शेतकरी शंकर चायरे यांनी लिहिलेल्या पत्रात, मी कर्जबाजारी झालो त्यामुळे आत्महत्या करतो आहे, या आत्महत्येला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार आहे. माझ्या मुलांकडे आणि घरातल्यांकडे लक्ष ठेवा, असे चायरे यांनी म्हटले होते. चायरे यांच्यामागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असे कुटुंब आहे.

 

News English Summary: The farmer’s name was Shankar Bhaurao Chaire and he committed suicide on April 10, 2018 due to a debt of Rs 3 lakh and depression. But before committing suicide, he had written a total of six water suicide notes mentioning Indian Prime Minister Narendra Modi. Shankar Bhaurao Chaire, a farmer who committed suicide, was a resident of Rajurwadi in Ghatanji taluka.

News English Title: Yavatmal Farmer was commit suicide and he had took responsible for Modi Government news updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x