19 April 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

आमची ती भेट व जुन्या आठवणी, अन मनसेची भेट ती सेटलमेंट? सेनेचा रडवा प्रचार सुरु होणार?

मुंबई : मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने वापरलेलं जुनं तंत्र म्हणजे पक्षीय राजकारणाच्या भेटी गाठी. मातोश्री किंवा मातोश्री बाहेर शिवसेना आणि इतर पक्षीय नेत्यांच्या राजकीय किंवा खासगी भेटीगाठी झाल्या की प्रसार माध्यमांपुढे सहज, औपचारिक आणि जुन्या आठवणी असे शब्द प्रयोग करून विषय टोलवण्यात शिवसेना अगदी तरबेज असल्याचे मागील अनेक घटनांवरून पाहायला मिळाले.

परंतु, त्याच शिवसेना नैतृत्वाला आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना राज ठाकरे कृष्णकुंज किंवा बाहेर एखाद्या ठिकाणी भेटल्यास समाज माध्यमांवर ‘सेटलमेंट’ ‘शिवसेनेला शह देण्यासाठी’ ‘सेनेचा उमेदवार पाडण्यासाठी’ ‘मराठी मतं फोडण्यासाठी’ अशी रडावी टीका टिपणी करून त्यांच्याबद्दल प्रदूषित राजकीय वातावरण निर्मिती करण्याचे तंत्र शिवसेनेने सऱ्हास पणे अवलंबले होते. विशेष म्हणजे त्यांना मनसे आणि राज ठाकरे यांची प्रतिमा डागाळण्यात चांगलं यश सुद्धा मिळालं होतं, हे आकडेवारी सुद्धा सांगते. विशेष म्हणजे २०११ मध्ये कोणतीही निवडणूक नसताना जाहीरपणे गुजरातचा दौरा करणाऱ्या राज ठाकरे यांनी खुलेआम पत्रकार परिषद घेतल्या होत्या. याच दौऱ्याचे शिवसेनेने २०१४ मधील निवडणुकीत मोठं भाडंवल केलं होतं. परंतु, २०१४ लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना स्वतः उद्धव ठाकरे, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर गुजरातला पाठच्या दाराने जाऊन मोदींना भेटून आले आणि कोणतीही वाच्यता न करता प्रचारात स्वार्थ साधला होता.

सध्या समाज माध्यमांचा अभ्यास केल्यास शिवसैनिकांचा एकमेव कार्यक्रम म्हणजे मनसेवर पोस्ट करत बसणं. त्यात एखादी राजकीय व्यक्ती खरोखर सहज, औपचारिक, जुन्या आठवणी किंवा राजकीय विषयावरून राज ठाकरेंना भेटली, की शिवसैनिकांचा समाज माध्यमांवर ‘सेटलमेंट’ अशा पोस्टचा सुळसुळाट वाढलाच म्हणून समजा. शिवसेना पक्षप्रमुख आणि नेते ,मंडळी भाजप विरुद्ध तर समाज माध्यमांवर शिवसैनिक मनसे विरुद्ध नेहमीच व्यस्त असल्याचं अनुभवण्यास येत. त्यामुळे स्वबळाची भाषा करून पुन्हा भाजपशी युती झाल्यास, शिवसेनेने पुन्हा तेच जुनं तंत्र अवलंबल्यास नवल वाटायला नको.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x