4 February 2023 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार? Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर?
x

आगामी निवडणूक; मागे लागलेल्या रोडरोमियोत शिवसेनेला इंटरेस्ट असल्याचे वृत्त?

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूकपूर्व सर्व्हेचा धसका घेतल्याचं समजतं. त्यामुळे स्वबळ वगरे बाजूला ठेवून शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचं सूत्र जवळपास ठरल्याचे वृत्त प्रसार माध्यमांकडे आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून जागावाटपावरून येणाऱ्या प्रस्तावावरून प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, ‘रोडरोमियोसारखे आमच्या मागे का लागता? आम्हाला तुमच्यात इंटरेस्ट नाही’, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला फटकारलं होतं. परंतु, सध्याच्या वृत्तानुसार त्याच रोडरोमियोने खुश करणारा प्रस्ताव समोर ठेवल्याने शिवसेनेचा इंटरेस्ट वाढल्याचे वृत्त आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष २५, तर शिवसेना २३ जागा लढवणार असून विधानसभा निवडणुकीत भाजपा १४५, तर शिवसेना १४३ जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाच मोठा भाऊ असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं मिशन १५१ची घोषणा केल्यानं दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले. त्यावरुन युती तुटली होती. परंतु, आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपाची युती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1662)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x