27 November 2022 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन? Investment Tips | सरकारी योजनेत नो टेन्शन, ही योजना 44 रुपये जमा करून देईल 27 लाख परतावा, स्कीम डिटेल वाचा
x

वीर सावरकरांना भारतरत्न द्या, ढोंगी प्रेम दाखवू नका, संजय राऊतांनी भाजपाला घेरलं

Sanjay Raut

Sanjay Raut | वीर सावरकर यांच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीवर टीका केली होती. त्या टीकेला आज संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं. तसंच एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

भारतरत्नची मागणी
वीर सावरकर यांच्याबाबत ढोंगी प्रेम दाखवू नका त्यांना भारतरत्न ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी करत आहोत. त्यांना भारतरत्न पुरस्कार का दिला जात नाही? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. वीर सावरकर हिंदूहृदय सम्राट होते, त्यांच्या नंतर बाळासाहेब ठाकरे हेच हिंदूहृदयसम्राट असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब आज असते तर
बाळासाहेब आज जर असते आणि ज्यांनी कमरेखाली घाव घातले असते, त्यांची अवस्था आज फार वाईट करून सोडली असती. त्यांच्याकडे फटकारे होते, ज्या भूमिका आणि विचार होते, त्यामुळे महाराष्ट्र भक्कम झाला. ते हिमालयापेक्षा मोठे होते. आज त्या तोडीचे नेतृत्व राज्यात नाही. आजही बाळासाहेबांच्या नावाने जे तोतये निर्माण झाले आहे, ते फार काळ टिकणार नाही’, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल फक्त निष्ठावंतांच्या हातात असू शकते. कारण बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात निष्ठा आणि अस्मिता या शब्दाला महत्त्व प्राप्त करून दिलं. त्याचं तेज कुणालाही हिरावून घेता येणार नाही. शिवसेना प्रमुखांना जाऊन दहा वर्षे झाली आहेत. त्यांच्या नंतर काही जण शिवसेना तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता जे म्हणत आहेत की बाळासाहेब ठाकरेंचा विचार आमचा ते ढोंगी आहेत. बाळासाहेब ठाकरे यांन ढोंगाचा सतात तिरस्कार केला असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sanjay Raut talked on Veer Savarkar check details on 17 November 2022.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x