27 July 2024 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

KP Gosavi Detained | फरार आरोपी के पी गोसावीला पुणे पोलिसांकडून अटक

KP Gosavi Detained

मुंबई, 28 ऑक्टोबर | मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच तसेच परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला फरार आरोपी के पी गोसावीला आज सकाळी पुणे पोलिसांनी अटक (KP Gosavi Detained) केलीय. कालच संध्याकाळी के पी गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. कालपर्यंत तो शरण आला नाही. अखेर पुणे पोलिसांनी आज त्याला अटक केलंय. आज दुपारी त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

KP Gosavi Detained. Fugitive accused KP Gosavi was arrested by the Pune police this morning on charges of cheating several youths under the pretext of getting jobs abroad as well as the NCB arbitrator in the Mumbai Cruise Drugs Party and Aryan Khan arrest case :

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांच्या टीम के पी गोसावीला शोधत होत्या. त्याची लूक आऊट नोटिस देखील जारी करण्यात आलेली होती. त्यानुसार पुणे पोलिसांचं पथक त्याचा शोध घेत होतं. अखेर आज सकाळी पुणे पोलिसांनी गोसावीला अटक केलीय.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी, “होय किरण गोसावीला आम्ही अटक केली आहे”, अशी अधिकृत माहिती त्यांनी दिलेली आहे. पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशनकडून त्याच्या अटकेची कारवाई केली गेली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: KP Gosavi Detained by Pune police early morning today.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x