11 December 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी - गृहमंत्री

SIT, Suicide case, MP Mohan Delkar, Anil Deshmukh

मुंबई, ०९ मार्च: दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत केला जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली. खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील एका हॉटेलमध्ये सापडला होता. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट सुद्धा लिहिले होते. त्यावरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली. (SIT will probe the suicide case of MP Mohan Delkar said home minister Anil Deshmukh)

गृहमंत्र्यांनी दिले उत्तर:
सभागृहात बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले महाराष्ट्र शासन यावर माझा विश्वास आहे. आत्महत्या केल्यानंतर मला न्याय महाराष्ट्रातच मिळेल. म्हणून त्रास गुजरातमध्ये असला तरीही आत्महत्या मुंबईत करत असल्याचे त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव यांनी सुद्धा मला पत्र पाठवले आहे. त्यामध्ये सुद्धा प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावर त्यांनी आरोप केले. स्थानिक प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांनी खूप त्रास दिला. त्यामुळे, त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असे सांगितले.

प्रफुल्ल खेडा पटेल हे सध्या दादरा-नगर हवेलीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. ते आधी गुजरातचे गृहमंत्री होते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असावेत तेव्हा पटेल हे गुजरातचे गृहमंत्री असावेत असा माझा कयास आहे. त्यानंतर पटेल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. तेव्हा सभागृहात एकच गदारोळ झाला.

डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही नावे समोर आली असून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यावरून हा भाजपला इशारा असल्याचे सुद्धा सांगितले गेले. मुख्यमंत्र्यांच्या याच दाव्याला देवेंद्र फडणवीस यांनी फुसका बार म्हटले आहे. डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांचे नाव नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: The SIT will probe the suicide case of Mohan Delkar, an independent MP from Dadra Nagar Haveli. Home Minister Anil Deshmukh made the official announcement in the Assembly on Tuesday. MP Mohan Delkar’s body was found in a hotel in Mumbai. He also wrote a suicide note before committing suicide. This led to a rift between Chief Minister Uddhav Thackeray and former Chief Minister Devendra Fadnavis.

News English Title: SIT will probe the suicide case of MP Mohan Delkar said home minister Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x