19 April 2024 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील
x

अक्षता नाईक यांच्या तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष | हसमुख यांच्या पत्नीच्या तक्रार अर्जावर आक्रमक - सविस्तर

Devendra Fadnavis, Anvay Naik, \Akshata Naik

मुंबई, ०९ मार्च: आज देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात हसमुख हिरे प्रकरणी थेट टीआरपी घोटाळा उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी सचिन वझेंवर खून केल्याचे आरोप केले. तसेच हसमुख हिरेन यांच्या पत्नीने तक्रारीत काय म्हटले त्याचं वाचन करून दाखवलं. त्यामुळे फडणवीसांवर समाज माध्यमांवर आणि थेट विधानसभेत आरोप होतं असून त्यासाठी त्यांच्या काळातील प्रकरणात त्यांनी कशी बघ्याची भूमिका घेतली होती ते समोर येऊ लागलं आहे.

दरम्यान, याबाबत आज शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांवर आक्रमक निशाणा साधला, जाधव म्हणाले की, २०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबून टाकले, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सासू आणि नवऱ्याच्या मृत्यूची चौकशी करावी असं पत्र दिलं, देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण दाबलं असंही म्हटलं, या प्रकरणाची चौकशी सचिन वाझे करत आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप करून त्यांना काढून टाकण्याची मागणी केली जातेय, पण सरकार सचिन वाझेंना काढणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला.

आता पाहू त्यावेळी अन्वय नाईक यांच्या मुलीने आणि पत्नीने पत्रकार परिषदेत काय आरोप केले होते:
Republic TV’चे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक या मायलेकींनी पत्रकार परिषद घेतली होती आणि अनेक मुद्दे माध्यमांसमोर मांडले होते. माझ्या नवऱ्याने सुसाईड नोटमध्ये तिघांची नावं लिहिली होती, पण त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नव्हती, पण महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली, मी त्यांची शतश: आभारी आहे, असं अक्षता नाईक म्हणाल्या होत्या. अर्णव गोस्वामींसारखी माणसं काम करुन घेतात आणि पैसे देत नाहीत. अर्णव यांनी सूडबुद्धीने हे सर्व केलं आहे, माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते जिवंत असते, तब्बल 83 लाख रुपये बाकी आहेत, फिरोजकडून ४ कोटी, इतरांकडून येणं होतं, पण तेही देऊ नका असे अर्नबने सांगितल्याचा धक्कादायक दावा अक्षता नाईक यांनी केला होता.

त्या पुढे म्हणाल्या होत्या की, ‘आम्ही जगायचं नाही का, फक्त अर्णव गोस्वामीला जगायचा अधिकार आहे का? पत्रकारिता अशी असते का? आमचे फोन टॅप केले होते, आम्ही संजय बर्वे, सुरेश वऱ्हाडे यांनाही भेटलो होतो. अर्णव गोस्वामींना अटक झाली हे खूप चांगलं झालं, त्या तिघांची नावं सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत, त्यांना यापूर्वीच अटक व्हायला हवी होती, मात्र का झाली नाही, मला माहिती नाही, असंही अक्षता नाईक म्हणाल्या होता. आमचं प्रकरणं भटकवण्याचा प्रयत्न झाला आहे, मोदींनाही पत्र लिहिलं होतं, अशी माहिती अक्षता नाईक यांनी दिली होती.

अन्वय नाईक आत्महत्या हे संपूर्ण प्रकरण २०१८ मधील असून त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील देवेंद्र फडणवीस हेच होते. नाईक यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्या प्रमाणे अर्णब गोस्वामींचा जवाब थेट जॉईंट सिपींच्या कार्यालयात नोंदवला गेला होता इतकी VIP ट्रीटमेंट त्यांना देण्यात आली होती. त्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी देखील नाईक कुटुंबियांना तक्रार केल्यानंतर विषय न्यायालयात येणार असल्याचं सांगून एवढं का झुलवत ठेवलं असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. त्यामुळे संपूर्ण प्रकरण नेमकं कोणत्या बाजूने दाबण्यात आलं होतं आणि नाईक कुटुंबियांच्या तक्रारीला कोणी केराची टोपली दाखवली होती याचा पूर्ण अंदाज येऊ शकतो असं राजकीय विश्लेषक मत नोंदवत आहेत. कारण अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर भाजपने दिल्ली ते गल्ली केलेला थयथयाट भाजपवरीलच संशय गडद केला होता. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील भूमिका ही त्यांच्यावरच संशय निर्माण करणारी आहे असंच म्हणावं लागेल.

 

News English Summary: Today, Devendra Fadnavis accused the legislator of murdering Sachin Vazhen, a police officer who directly exposed the TRP scam in the Hasmukh Hiray case. Also, Hasmukh Hiren’s wife read out what she said in the complaint. As a result, Fadnavis is being accused on social media and directly in the Legislative Assembly.

News English Title: Why Devendra Fadnavis was ignored on Akshata Naik complaints news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x