26 April 2024 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

अंतिम वर्ष परीक्षा वाद सुप्रीम कोर्टात, न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली

Shivsena, files petition, Supreme court, UGC, Final Year Exam

मुंबई, १८ जुलै : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

दुसरीकडे महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती आधीच जाहीर केली आहे. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.

त्यानंतर या निर्णयाला राहुल गांधी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. याविषयाला अनुसरून राहुल गांची यांनी म्हटलं होतं की, “कोरोना आपत्तीत परीक्षा घेणं चुकीचं आहे. मागील वर्षाच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. दरम्यान मनुष्यबळ विकास आणि UGC च्या या निर्णयावर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली होती.

एकाबाजूला महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यावर ठाम आहे. परंतु, यूजीसीने सप्टेंबरपासून परवानगी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेनं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानंतर युवासेनेने यूजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यामुळे याबाबत सर्वोच्च न्यायालय नेमकी कोणती भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.

 

News English Summary: Following Aditya Thackeray’s order, Yuvasena has filed a writ petition in the Supreme Court against the UGC’s decision to conduct the final year exams. So it remains to be seen what role the Supreme Court will play in this regard.

News English Title: Shivsena files petition in Supreme court on the issue of final year exam against UGC decision News latest Updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x