15 December 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

मुंबई हायकोर्टाचा शिंदे गटाला झटका, बीएमसीला फटकारत ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी

Shiv Sena Dasara Melava 2022

Shiv Sena Dasara Melava 2022 ​​| शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्याची मागणी शिवसेनेनं महापालिकेकडे केली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचं कारण महापालिकेकडून देण्यात आलं. महापालिकेच्या भूमिकेनंतर शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने निकाल दिला. शिंदे गटाला झटका बसला असून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे.

दसरा मेळाव्यात नेमका कुणाला अनुमती द्यावी या मुद्द्यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टात मुंबई महापालिका, एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट या तीनही पक्षकारांकडून युक्तीवाद केला. तीनही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल वाचनाला सुरुवात केली. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली.

पुढे मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेने स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचं सांगताना, अर्जावर निर्णय देताना २० दिवसाचा विलंब केला, मात्र अर्ज नाकारताना बीएमसी आणि पोलिसांमध्ये केवळ एकदिवसात घडामोडी घडल्या असं कोर्टाने नमूद केलं. पोलिसांनी पालिकेला कायदा आणि सुव्यवस्थेचा २१ तारखेला अहवाल दिला. कायदा-सुव्यवस्थेमुळे परवानगी न देण्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता, असं कोर्टाने म्हटलं.

दोन्ही अर्जांची कल्पना मुंबई महापालिकेला होती. मुंबई महापालिकेकडे शिवसेनेनं अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांचा अहवाल महापालिकेला मिळाला. मात्र, शिवसेनेनं कायदा व सुव्यवस्था राखण्याची हमी दिली. मात्र, महापालिकेनं अधिकारांचा गैरवापर केला, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली.

आमचा निकाल देण्यापूर्वी आम्ही स्पष्ट करतो, खरी शिवसेना कुणाची यावर आम्ही भाष्य करत नाही. तो विषय सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयगोकडे प्रलंबित आहे. या निकालाचा त्यांच्या सुनावणीवर किंवा निकालावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. राज्य सरकारनं शिवाजी पार्कचा वापर 45 दिवस विविध कार्यक्रमांसाठी राखीव ठेवला आहे. पालिकेच्या मागणीनंतर मुंबई पोलिसांनी आपला अहवाल दिलेला आहे. दादर पोलीस स्टेशननं पोलीस संख्याबळ पाहता आपल्या अहवालात कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर दोन्ही अर्ज फेटाळून लावण्याचं मत दिलेलं आहे. अर्ज फेटाळून पालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरूपयोग केल्याचं स्पष्ट होतंय – हायकोर्ट

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shiv Sena Dasara Melava 2022 petition in Bombay High Court check details 23 September 2022.

हॅशटॅग्स

#Shiv Sena Dasara Melava 2022(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x