14 December 2024 4:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

LIC Share Price | एलआयसी शेअरचे गुंतवणूकदार टेन्शनमध्ये, शेअरची किंमत निच्चांकी पातळीवर, पुढे काय होणार जाणून घ्या

LIC share Price

LIC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या शेअर्समध्ये कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. बीएसई निर्देशांकावर इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांनी पडले आणि 52 आठवड्यांच्याही खालील 648 रुपये या नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत होते. भारत सरकारच्या मालकीच्या या विमा कंपनीचा स्टॉक सध्या 650 रुपयांच्याही खाली पडला आहे. 20 जून 2022 रोजी LIC च्या शेअरने 650 रुपयांची नीचांकी किंमत पातळी गाठली होती.

LIC चा IPO मे 2022 मध्ये आला होता :
ज्यांनी LIC च्या IPO मध्ये पैसे गुंतवले होते, त्यांना सध्या मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. LIC ची IPO इश्यू किंमत प्रति शेअर्स 949 रुपये होती, ती सध्या इश्यू किमतीच्या 32 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहे. LIC IPO 17 मे 2022 रोजी बाजारात सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंग झाल्यापासून आतापर्यंत एलआयसीमध्ये सतत घसरण सुरू आहे. मागील एका महिन्यात S&P BSE सेन्सेक्स निर्देशांकात 0.41 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत LIC चा स्टॉक 4 टक्क्यांनी घसरला आहे. शिवाय, बेंचमार्क निर्देशांकात 14 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत मागील तीन महिन्यांत LIC च्या स्टॉकमध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली आहे.

निव्वळ नफ्यात वाढ :
एप्रिल ते जून 2022 दरम्यान LIC चा निव्वळ नफा 232 पटीने अधिक वाढ झाली असून, एकूण निव्वळ नफा 682.89 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून 2021 या तिमाहीत LIC चा निव्वळ नफा फक्त 2.94 कोटी रुपये होता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मागील आर्थिक वर्षातील मार्च 2021 च्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीने खराब कामगिरी केली आहे. LIC ने मार्च 2022 च्या तिमाहीत 2,371 कोटी रुपयेचा निव्वळ नफा कमावला होता. LIC चे प्रीमियम च्या माध्यमातून आलेले उत्पन्न 14,614 कोटी रुपये होते आणि या कालावधीत नवीन पॉलिसींमधून LIC ने 2,11,451 कोटींचे एकूण उत्पन्न कमावले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| LIC share Price returns has dropped and huge fall in stock after IPO launched on 23 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x