30 April 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता सुसाट तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राइस जाहीर Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

'मेरा बूट सबसे मजबूत', भाजप खासदार व आमदारांचा एकमेकांवर 'चप्पल स्ट्राईक'

BJP, Narendra Modi, Amit Shah

संत कबीरनगर : समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षामध्ये झालेल्या आघाडीने यूपीत भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वादही उफाळून आला आहे. संत कबीरनगर मतदारसंघामध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान भाजपा खासदार शरद त्रिपाठी आणि स्थानिक आमदार राकेश सिंह यांच्यात तुफान हाणामारी झाली. या प्रकाराच्या व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या युपीमध्ये सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून विविध ठिकाणी उदघाटन आणि भूमिपूजनाचे सोहळे आयोजीत करण्यात येत आहे. तसाच कार्यक्रम संत कबीरनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार शरद त्रिपाठी आणि मेहदावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार राकेश सिंह यांच्यासह भाजपाचे इतर नेते उपस्थित होते.

यावेळी भूमिपूजनाच्या शिलालेखावर आपले नाव नसल्याने खासदार शरद त्रिपाठी संतप्त झाले. त्यावरून त्यांची राकेश सिंह यांच्याशी बाचाबाची झाली. त्यावेळी शरद त्रिपाठी यांनी चप्पल काढून राकेश सिंह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार राकेश सिंह यांनीही त्रिपाठी यांना प्रत्युत्तर देत मारहाण केली. अखेर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले व दोन्ही नेत्यांना एकमेकांपासून दूर नेले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x