18 November 2019 12:23 AM
अँप डाउनलोड

पुणे: नगरसेवकांची लायकी काढणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांच्या थोबाडीत दिली

पुणे : पुणे महानगर पालिकेतील अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांच्या देखतच चोप देण्यात आला आहे. नगरसेवकांच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून महापौर दालनात सदर घटना घडल्याचे वृत्त आहे. प्रभागातील जलपर्णी हटवण्याच्या गैरव्यवहाराबाबत विचारणा करत असताना संबंधित घटना घडल्याचे समजते. दरम्यान यावेळी स्वतः पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक देखील हजर होत्या. पुणे महापालिके’मध्ये भर दुपारच्या वेळी ही घटना घडल्याने त्याचे राजकीय वर्तुळात देखील मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात यते आहे.

जलपर्णी गैरव्यवहारात भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि अधिकारी यांचा प्रामुख्याने सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतो आहे. त्याविषयी एनसीपी आणि काँग्रेसने महापौर दालनात आज ठिय्या आंदोलन पुकारलं होतं. दरम्यान महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकानी महापौरकडे उचलून धरली होती. ज्यांनी निविदा काढल्या त्यांच्याकडून खुलासा नको, अधिकारी चोर आहेत, अशा घोषणा सुद्धा कार्यकर्त्यांकडून दालनातच देण्यात आल्य. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त निंबाळकर त्याठिकाणी नेमके उपस्थित होते.

नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर यांनी निंबाळकर यांसमोर जलपर्णीच्या विषयाला अनुसरून काही प्रश्न उपस्थित केले. मात्र, त्यांनी दिलेल्या उत्तराने संबंधितांचे समाधान न झाल्याने त्यावर मोठी वादावादी होण्यास सुरुवात झाली. यावेळी नगरसेवकांसोबत उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांना चोप देण्यास सुरुवात केली. ‘अधिकारी चोर आहेत’ असा आरोप काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला. त्यावर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर म्हणाले, ”हे ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नसून तुमची काय लायकी आहे”. याबाबत प्रतिक्रिया देताना महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, अतिरिक्त आयुक्तांचे विधान देखील योग्य नसून संबधित निविदेची २४ तासात चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.

हॅशटॅग्स

#Congress(295)#NCP(221)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या