14 November 2019 1:10 PM
अँप डाउनलोड

मुंबईकर आजही संतापले, भाजप कार्यकर्त्यांच्या बसेस रोखल्या

मुंबई : वर्धापन दिनानिम्मित भाजपच्या मुंबईमध्ये आयोजित केलेल्या महामेळाव्यामुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. संतप्त मुंबईकरांनी अखेर बीकेसीकडे जाणाऱ्या भाजपच्या बसेस रोखल्या.

काल सुद्धा अमित शहा यांच्या स्वागतासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आल्याने पश्चिम द्रूतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तब्बल ४-५ तास मुंबईकर पश्चिम द्रूतगती मार्गावर अडकून पडले होते. त्या बाईक रॅलीमुळे काल सुद्धा मुंबईकरांचे हाल झाले होते.

आज पुन्हा त्याचाच प्रत्यय पाहायला मिळत आहे. परंतु आज चित्र असं होत की, वांद्रे टर्मिनसहून बीकेसीकडे जाण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना बस मिळते परंतु सामान्य मुंबईकरांना बीकेसीकडे जाणारी बस मिळत नसल्याने संतापलेल्या सामान्य मुंबईकरांनी भाजप कार्यकर्त्यांची बस अडवली. महामेळावा संपल्यानंतर सुद्धा तोच प्रकार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(175)BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या