26 April 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

झारखंड सरकार पाडण्यात महाराष्ट्रातील माजी मंत्र्यांचा हात? | आरोपींची कबुली | पोलीस नोटीस पाठवणार

Topple Jharkhand Govt

रांची, ०७ ऑगस्ट | झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न करण्यात आले असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणात झारखंड पोलिसांनी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा खुलासा केला होता. तर रांची येथील डीएसपी प्रभात रंजन यांनी याप्रकरणात शुक्रवारी आरोपी अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण प्रसाद यांची चौकशी केली. यावेळी या आरोपींनी महाराष्ट्रातील नेत्यांशी आपले संबंध असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे झारखंड पोलीस हे महाराष्ट्रातील नेत्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी चौकशी दरम्यान नोटीस पाठवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

1 कोटी रुपये रोख देण्याच्या बाबीवरून नाराजी:
झारखंड पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिन्ही आरोपींनी अशी कबुली दिली आहे की, झारखंडमधील तीन आमदार हे दिल्ली येथे गेले होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या भाजपा नेत्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत 1 कोटी रुपये रोख देण्याच्या बाबीवर आम्ही नाराज होऊन सर्वजण माघारी परत आलो होतो. पुन्हा आम्हाला मनवण्यासाठी ते रांची येथेही आले होते, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.

माझी झारखंडच्या नेत्यांशी भेट झाली नाही:
बावनकुळेझारखंड सरकार अस्थिर करण्यासाठी सरकारमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षाच्या आमदारांना पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचा खुलासा झारखंड पोलिसांनी केला होता. या प्रकरणाचे नागपूर कनेक्शन पुढे आल्यानंतर आता बावनकुळे यांच्या दिल्लीवारीसोबत या प्रकरणाचा संबंध जोडला जात आहे. बावनकुळे यांनी देखील १५ जुलै रोजी दिल्लीला गेल्याचे मान्य केले आहे. मात्र दिल्ली दौऱ्याचा उद्देश केवळ नवनियुक्त मंत्र्यांच्या भेटी घेणे एवढाच होता, असा दावा त्यांनी केला आहे. या दौऱ्यात माझी झारखंडच्या कोणत्याही नेत्यांशी किंवा आमदारांसोबत भेट झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Conspiracy to topple the government in Jharkhand connection of BJP leaders from Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#Chandrashekhar Bawankule(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x