8 May 2024 6:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

बीडीडी चाळ पुनर्विकास समितीतून सेनेला डावललं; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर नाराजी

Aditya Thackeray, Aaditya Thackeray, CM Devendra Fadnavis, BDD Chawl

मुंबई : मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबईतील विविध ठिकाणच्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्पाच्या बाबतीत ३१ ऑगस्टला भेट घेणार असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. म्हाडाच्या प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात गुरुवारी वांद्रे येथील म्हाडा भवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये ही त्यांनी ही माहिती दिली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी येत्या २६ तारखेला प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये याबाबतचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असेही सांगण्यात आले. यावेळी शिवसेनेचे इतर आमदारही उपस्थित होते.

गृहनिर्माण धोरण, बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास, म्हाडाच्या ५६ वसाहतींचा पुनर्विकास, कॉर्पोस फंड, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न, सेवाशुल्क, संक्रमण शिबिरे या प्रलंबित प्रश्नांबाबत आदित्य यांनी शिवसेनेचे आमदार यांच्यासोबत बुधवारी चर्चा केली होती. गिरणी कामगारांना सोडतीमध्ये मिळालेली घरे विकता येत नव्हती, मात्र आता ही अट शिथिल करून पाच वर्षांपर्यंत करण्यात येणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारची पीक विमा योजना कंपन्यांच्या फायद्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे. मात्र, विमा कंपन्यांच्या कारभारामुळं ९० लाख शेतकरी या योजनेस अपात्र ठरले आहेत. त्यासाठी काय निकष लावले गेले हे तपासण्याची गरज असून सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळालीच पाहिजे,’ अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

‘मातोश्री’ निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पीक विमा योजनेची अंमलबजावणी व विमा कंपन्यांच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. विमा कंपन्यांचे एजंट गावागावांत हफ्ते गोळा करतात. मात्र, नुकसानभरपाईच्या वेळी कोणी सापडत नाही. पीक विम्याचे २ हजार कोटी रुपये कंपन्यांकडं पडून आहेत. तो शेतकऱ्यांचा पैसा आहे. कंपन्यांचा नफा वगळून इतर सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवेत. कंपन्या देत नसतील तर सरकारनं तो पैसा परत घेऊन अन्य यंत्रणेमार्फत तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवा. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली आहे. त्यांना एक पत्रही दिलं आहे,’ असं उद्धव यांनी यावेळी सांगितलं.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x