12 December 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

आता वॉचमन-लिफ्टमन'साठी राम कदमांकडून 'ओडोमॉस' वाटप; नेटकऱ्यांनी झाडलं

मुंबई : सध्या मच्छरचा त्रास हा केवळ रात्रपाळी करणाऱ्या वॉचमन – लिफ्टमनलाच होतो याचा जावईशोध भाजपचे वादग्रस्त आमदार राम कदम यांनी लावला आहे. त्यासाठीच त्यांनी थेट ‘ओडोमॉस’ जाहिरातबाजी करून त्यांनी आपला एक व्हिडीओ ७ नोव्हेंबर रोजी फेसबूक आणि ट्विटरवरुन शेअर केला होता. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. हा व्हिडीओपाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.

जवळपास अडीच मिनिटांचा हा व्हिडिओ असून यामध्ये राम कदमांनी एखाद्या सोवळ्याप्रमाणे एक वस्त्र अंगावर परिधान केले आहे. तसेच ते स्वच्छ हिंदीतून आपले म्हणणे मांडताना दिसत आहेत. मात्र, त्यांचे आसना समोर मोठ्या टेबलावर ओडोमॉसचे पॅक सजवून ठेवण्यात आले आहेत. परंतु,नेमका उद्देश काय हे प्रथम समजत नव्हतं, कारण आमदार साहेबांनी या ओडोमॉसच्या पॅक्ससोबत हा व्हिडिओ तयार केला आहे. त्यात नीट पाहिल्यास ते ‘ओडोमॉस’ची जाहिराततर करत नाहीत ना ज्यासाठी त्यांना हे कंपनीने मोफत दिले असावेत असच प्रथम दर्शनी वाटेल. कारण सध्या नकारात्मक मार्केटिंग अधिक फलदायी ठरते हे सर्वांना ठाऊक झालं आहे.

समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमधून राम कदम सांगतात की, मुंबई शहरांमधील विविध सोसायट्यांमध्ये वॉचमन, लिफ्टमन काम करतात. त्यांना रात्रपाळीच्यावेळी नेहमीच मच्छर चावण्याचा त्रास सहन करावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांना मोफत हे ओडोमॉसच्या पॅकचे वितरण करण्यात येणार आहे. बऱ्याचदा वॉचमनचे काम करणारे लोक हे वयस्कर आणि आपल्या वडिलधाऱ्यांप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असतात. त्यामुळे त्यांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी ओडोमॉस वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या महाशयांना सध्या परप्रांतीय मतं अधिक महत्वाची असल्याने ते याच समाजाला अधिक लक्ष करत असतात. दुसरं म्हणजे रात्रपाळीचा वेळी मच्छरचा त्रास इथल्या पोलिसांना सुद्धा होतो याची या महाशयांना जाणीव नसावी. मंत्रालयात गाजलेला उंदीर घोटाळ्याविषयी सुद्धा या महाशयांनी दिलेली प्रतिक्रिया हास्यास्पद होती. उंदीर घोटाळ्याचा विषय होता महाराष्ट्राच्या मंत्रालयातील आणि तिथे सुद्धा राम कदम हिंदीतच ट्विट करून माहिती देत होते.

परंतु, या व्हिडिओनंतर अनेकांनी राम कदम यांना ट्रोल केले आहे. आणि त्यांच्या या उपक्रमाची खिल्ली उडविली आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x