14 November 2019 12:04 AM
अँप डाउनलोड

भाजप आमदार व प्रवक्ते राम कदम'च मोदी भक्तांच्या ट्रॅपमध्ये, फेक व्हिडिओ'मध्ये मोदी व फडणवीसांना टॅग

मुंबई : मुख्य व्हिडिओमध्ये मोडतोड करून फेक व्हिडिओ बनविणे आणि ते वायरल करणे हे समाज माध्यमांवर नित्याचच झालं आहे. परंतु विषय गंभीर तेव्हा होतो जेव्हा एखाद्या पक्षाचा आमदार आणि प्रवक्ते पदावर असलेली जवाबदार व्यक्ती खोट्या गोष्टी समाज माध्यमांवर वायरल करते. तसाच काहीसा प्रकार केला आहे भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी तो सुद्धा ट्विट करत.

आमदार राम कदम यांनी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकपूर्व प्रचारा दरम्यानचा एक विडिओ ट्विट केला आहे. परंतु केवळ आमदारच नाही तर भाजप प्रवक्ते पदावर असलेल्या राम कदमांनी कोणतीही शहानिशा न करता मोडतोड केलेला विडिओ शेअर केला आहे.

त्या ट्विट मध्ये राम कदम यांनी म्हटलं आहे की, “एक विलक्षण भाषण केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लहान मुलाला विचारलं की ‘तुला सर्वाधिक कोण आवडत?’ ट्रम्प यांना वाटलं लहान मुलगा ट्रम्प बोलेल. परंतु व्हिडिओ पहा… त्या निरागस लहान मुलाने काय उत्तर दिल… ट्रम्प यांना धक्काच बसला….हा व्हिडिओ BBC न्यूज’वर खूप सुपरहिट होत आहे.

परंतु वास्तविक तो लहान मुलगा मोदी नव्हे तर डोनाल्ड ट्रम्प’च बोलला होता.

आमदार राम कदम यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा ट्विट केलेला फेक व्हिडिओ;

आणि हा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा व्हिडिओ

हॅशटॅग्स

BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या