27 April 2024 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार?
x

Maha TET Exam | टीइटी परीक्षा कायद्यातील दुरुस्तीसाठी राज्याचा केंद्राकडे पाठपुरावा

Maha TET Exam, education minister Varsha Gaikawad

मुंबई, ०५ मार्च: महाराष्ट्रात ज्या शिक्षकांनी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यानंतर त्यांना ही कायमस्वरुपी लागू राहावी असा राज्य सरकारचा आहे. त्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच महत्वाची बैठक आयोजित करणार आहेत. त्यासाठी विधानपरिषदेच्या सभापतींसोबत लवकरच चर्चा केली जाणार आहे. सभापतींसोबत चर्चा करुण नंतरच हा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्या विधानपरिषदेत बोलत होत्या.

या परीक्षेत उत्तीर्ण शिक्षकांना न्याय देण्याबाबत सदस्य नागो गाणार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. शिक्षक पात्रता परीक्षा (Maha TET Exam) उत्तीर्ण होणे शिक्षकांना आवश्यक आहे. ही किमान अर्हता प्राप्त करण्यासाठी वाढीव संधी देण्याची बाब केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे. त्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या.

दरम्यान, राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (Maha TET Exam) ही एकूण 16 वेळा झाली. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांना अनिवार्य आहे. त्यामुळे हा निकष पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना संधी वाढवण्यात याव्यात, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. तसेच, परीक्षा देण्याच्या संधीमध्ये वाढ करायची की नाही?, हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत केंद्राला पत्रसद्धा पाठवले आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल (Maha TET Exam) कायद्यात दुरुस्ती करण्याच्या महाधिवक्त्यांच्या मताला विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या.

 

News English Summary: In Maharashtra, it is the responsibility of the state government to ensure that teachers who have passed the qualifying examination are allowed to apply permanently. For this, the state’s school education minister Varsha Gaikwad will soon hold an important meeting. For this, discussions will be held with the Speakers of the Legislative Council soon. This decision will be taken only after discussing with the speakers, informed Varsha Gaikwad. She was speaking in the Legislative Council.

News English Title: Maha TET Exam education minister Varsha Gaikawad talked on future changes in rules news updates.

हॅशटॅग्स

#MahaTETExam(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x