महत्वाच्या बातम्या
-
ICSI CS Exam 2022 | ICSI कडून CS फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर
सीएस फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर करण्यात (ICSI CS Exam 2022) आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने CS फाउंडेशन परीक्षेची तारखांची ९ ऑक्टोबर २०२१ रोजी घोषणा केली आहे. यानुसार ही परीक्षा ३ आणि ४ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येईल. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर नोटिफिकेशन तपासून डाउनलोड करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
MAH MBA CET Result 2021 | सीईटीचा निकाल लवकरच जाहीर होणार
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा, MBA/ MMS आणि MHT-CET परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर २०२१ च्या आसपास जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. ही प्रवेश परीक्षा १६ ते १८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात (MAH MBA CET Result 2021) आली होती. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते ज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन ताजे अपडेट्स आणि निकालाची अधिक माहिती पाहू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
DFCCIL Answer Key 2021 | DFCCIL १०७४ पदांची भरती | परीक्षेची उत्तरतालिका जाहीर
DFCCIL Recruitment 2021: रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडतर्फे भरतीसाठी परीक्षा संपन्न झाली. या निवड प्रक्रियेअंतर्गत विविध विभागांमध्ये १०७४ ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्हआणि ज्युनिअर मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) परीक्षेची उत्तरतालिका जाहीर (DFCCIL Answer Key 2021) करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
MH-CET Entrance Exam | काळजी नको, अतिवृष्टीमुळे CET परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी - राज्य सरकार
राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्त्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करावी लागली - आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांची लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अचानक घेतला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातली माहिती दिली. तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पुढे ढकल्याचे त्यांनी न्यासा या संस्थेवर परीक्षा रद्द होण्याचे खापर फोडले आहे. न्यासाही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सरकारच्या या गोधळाच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Updates | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल जाहीर | आता मुख्य परीक्षेची तयारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा 2020 राज्यातील विविध केंद्रांवर 21 मार्चला घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती.
3 वर्षांपूर्वी -
UPSC Examination 2022 Calendar | यूपीएससीकडून 2022 च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीच्या सीडीएस, एनडीए, आयईएस, सीआयएसएफ सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी upsc.gov.in ला भेट देऊन वेळापत्रक पाहावं. 2022 मधील यूपीएससीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होतील.
3 वर्षांपूर्वी -
MHT CET 2021 | एमएचटीसीईटी परीक्षेची नोंदणी पुन्हा सुरु | असा करा अर्ज
राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्ज नोंदणी करण्यास पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | FYJC प्रवेशासाठीची CET मुंबई हायकोर्टाकडून रद्द
अकरावी प्रवेशासाठीची CET हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. 28 मे चा यासंदर्भातला अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे हायकोर्टाने सांगितले आहे. राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची याचिका केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. मुंबई हायकोर्टात राज्य सरकारतर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Exam Updates | MPSC ची रखडलेली परीक्षा ४ सप्टेंबरला | आयोगाकडून परिपत्रक
MPSC’तर्फे २०१९ मध्ये संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर २०२० मध्ये घेतली जाणारी परीक्षा सहा वेळा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून सर्व विद्यार्थी परीक्षा केव्हा होणार या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता परीक्षेची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे महेश धरबुडे यांनी केली होती.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | MAHA TET 2021 | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (T.E.T) 2021 | ऑनलाईन अर्ज करा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी (MAHATET) साठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 03 ते 25 ऑगस्ट 2021 पर्यंत MAHA TET चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
MAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित
महाराष्ट्रातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यातील HSC परीक्षा रद्द | आपत्ती व्यवस्थापन खात्याच्या बैठकीत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर
राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. अशात विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे असल्याकारणाने राज्य सरकारने १० वीची परीक्षा रद्द केली होती. मात्र, १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, १२ वीची परीक्षाही रद्द करण्यात यावी अशी मागणी होत होती.
4 वर्षांपूर्वी -
दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन | अकरावी प्रवेशाबाबत राज्य सरकारने दिली माहिती
मागील अनेक दिवस १०वी आणि १२वीच्या परीक्षेवरुन त्यानंतर त्याच्या निकालावरुन सावाळा गोंधळ उडाला होता. पालक, विद्यार्थी यांच्यातही संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज (२८ मे) पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | MPSC विद्यार्थ्यांचा कोरोनाने मृत्यू | परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती | तेव्हा मुख्यमंत्री हेच सांगत होते?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएसी) पूर्वपरीक्षेची यापूर्वी नवीन तारीख जाहीर केली होती आणि त्यानुसार ती परीक्षा गेल्या महिन्यातील २१ मार्चला होणार असल्याचे जाहीर केले होते. याशिवाय, २७ मार्च आणि ११ एप्रिलला होणाऱ्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर एमपीएससीने हा निर्णय घेतला होता.
4 वर्षांपूर्वी -
HSC Board Exams 2021 | 3 एप्रिलपासून 12'वी च्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 12 वी च्या विद्यार्थ्यांना 3 एप्रिलपासून परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध येणार आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयं महाराष्ट्र राज्य बोर्डच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरुन हॉलतिकीट डाऊनलोड करु शकतील. यासाठी त्यांना शाळा/महाविद्यालयांचा लॉगईन आयडी (Login ID) वापरावा लागेल.
4 वर्षांपूर्वी -
...तर १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार
१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनामुळे १०वी आणि १२वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
Maha TET Exam | टीइटी परीक्षा कायद्यातील दुरुस्तीसाठी राज्याचा केंद्राकडे पाठपुरावा
महाराष्ट्रात ज्या शिक्षकांनी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यानंतर त्यांना ही कायमस्वरुपी लागू राहावी असा राज्य सरकारचा आहे. त्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच महत्वाची बैठक आयोजित करणार आहेत. त्यासाठी विधानपरिषदेच्या सभापतींसोबत लवकरच चर्चा केली जाणार आहे. सभापतींसोबत चर्चा करुण नंतरच हा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्या विधानपरिषदेत बोलत होत्या.
4 वर्षांपूर्वी -
MBBS Final Year Exam | ८ मार्चपासून परीक्षा ऑफलाईनच होणार
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ८ मार्च पासून MBBS अंतिम वर्ष परीक्षेला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु, या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून राज्यातील अनेक असे केंद्र, महाविद्यालय आहेत जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर | शिक्षण मंत्र्यांची माहिती
कोरोना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात काही अडसर निर्माण झाले. परंतु, यावर देखील मात करुन यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, मात्र काहीशा उशिराने घेतल्या जाणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची तारीख अखेर आज अधिकृतपणे जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News