शिवीगाळ आणि खंडणी प्रकरणी सोलापूरचे उप महापौर आणि भाजप नेते राजेश काळेंना अटक
सोलापूर, ५ जानेवारी: महापालिकेचे उप महापौर राजेश काळे यांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. मागील आठवड्यात झालेल्या शिवीगाळप्रकरणी आज सकाळीच पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे, जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली असून राजकीय वादही पेटण्याची चिन्हे आहेत. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्तांना शिवीगाळ करणे तसंच खंडणी मागण्याचे गंभीर आरोप केल्याप्रकरणी उप महापौर राजेश काळे यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. यापूर्वीच राजेश काळे यांना स्वपक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षातून तसंच उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या राजेश काळे यांना अटक करण्यासाठी शहर पोलिसांनी विविध पथके तैनात केली होती दरम्यान मंगळवारी राजेश काळे हे पुण्यला जात असल्याची गोपनीय माहिती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आज टेंभुर्णी येथे त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांच्या प्रकरणी पक्ष गंभीर झाला आहे. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, पक्षनेता श्रीनिवास करली यांच्याशी सविस्तर चर्चा करून केलेला अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविण्यात आला आहे. उपमहापौर काळे यांच्या बाबतीत आता प्रदेशाध्यक्ष पाटील हेच निर्णय घेणार आहेत. पार्टी विथ डिफरन्स असल्याचे सांगणारी भाजप काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमहापौर राजेश काळे यांच्या वर्तणुकीबाबत पक्ष अत्यंत गंभीर असल्याचे सोलापूरचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी सांगितले होते. उपमहापौर काळे यांच्यावर कठोर कारवाई करवी, अशी शिफारस शहराध्यक्ष देशमुख यांनी या अहवालातून केल्याचे सांगण्यात येते.
News English Summary: Municipal Corporation Deputy Mayor Rajesh Kale has been arrested by Solapur Police. Police took action this morning in connection with last week’s abuse case. Therefore, there is a good discussion in the district and there are signs of political controversy. Deputy Mayor Rajesh Kale seems to be paying a high price for insulting the Commissioner and Deputy Commissioner of Solapur Municipal Corporation and making serious allegations of demanding ransom. Opposition parties, including the Bharatiya Janata Party (BJP), have demanded that Rajesh Kale be ousted from the post of deputy mayor.
News English Title: Solapur Municipal corporation deputy mayor Rajesh Kale arrested by police news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा