5 May 2024 6:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

स्व. बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक आणि शिवसेना यांचं मशाल चिन्हासोबतही जुनं नातं, पोटनिवडणुकीसाठी सज्ज

Shivsena Vs Shinde Camp

Shivsena Vs Shinde Camp | पहिली खरी लढाई पहिल्याच प्रयत्नात जिंकली, अशी प्रतिक्रिया देत ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गटाला मिळालेल्या नवीन नावाचं आणि चिन्हांचं स्वागत केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी शिंदे-ठाकरे गटाला नवीन नाव आणि चिन्हांचे वाटप केले. या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

त्या म्हणाल्या, आम्हाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव मिळालं आहे. पहिली खरी लढाई पहिल्याच प्रयत्नात जिंकली आहे. एक गाणं आहे, उषःकाल होता होता, काळरात्र झाली. मात्र शिवसैनिकांसाठी आता यातील काही ओळी बदलत आहे. उषःकाल होता होता, काळरात्र झाली, अरे शिवसैनिकांनो पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं गाणं त्यांनी म्हटलं. पेडणेकर म्हणाल्या, ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे.

शिवसेना आणि मशाल एक जुने नाते :
आधी शिवसेना नोंदणीकृत पक्ष नव्हता त्यामुळे शिवसेनेला 1989 मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळाले होते. त्याआधी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद ही अपक्ष म्हणून व्हायची. तर 1985 साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत विजयी झाले होते. तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सेनेचा पहिला खासदारसुद्धा मशाल याच चिन्हावर निवडून आला होता, असे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

तसेच 1989 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेना पुरस्कृत मोरेश्वर सावे हे देखील मशाल चिन्हावर खासदार झाले होते. शिवसेनेने यापूर्वी ढाल, तलवार, रेल्वे इंजिन, उगवता सूर्य, या विविध चिन्हांचा वापर केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Vs Shinde Camp in Andheri East by poll election check details 11 October 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena Vs Shinde Camp(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x