15 May 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी?

PSU Stocks

PSU Stocks | ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी अल्पकालीन गुंतवणुकीसाठी ऑईल इंडिया या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ऑईल इंडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 3.5 टक्क्यांच्या वाढीसह 628 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( ऑईल इंडिया कंपनी अंश )

मागील 3 महिन्यांत या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी ऑईल इंडिया स्टॉक 1.10 टक्के घसरणीसह 621.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तज्ञांनी ऑइल इंडिया कंपनीचे शेअर्स 629-634 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये पैसे लावताना तज्ञांनी 590 रुपये किमतीवर हार्ड स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही महिन्यांत 676 रुपये किमतीवर जाऊ शकतात. त्यानंतर या स्टॉकची दुसरी टार्गेट प्राइस 725 रुपये असेल. शेअर बाजारातील तज्ञांनी ऑईल इंडिया स्टॉकमध्ये 2 महिन्यांसाठी पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. ही टार्गेट प्राइस सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 15 टक्क्यांनी जास्त आहे.

मागील काही आठवड्यांपासून ऑइल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये कन्सोलिडेशन पाहायला मिळत आहे. सध्या ऑईल इंडिया स्टॉक सर्व महत्त्वाच्या मूव्हिंग ॲव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात ऑईल इंडिया कंपनीचे शेअर्स 4.7 टक्के वाढीसह 628 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. एप्रिल 2024 महिन्यात या कंपनीचे शेअर्स 548 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

3 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 669 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने साडेतीन टक्क्यांची वाढ नोंदवली होती. तर मागील एका महिन्यात या स्टॉकची किंमत अडीच टक्क्यांनी वाढली होती. मागील तीन महिन्यांत ऑईल इंडिया स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2024 या वर्षात ऑईल इंडिया स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे 66 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PSU Stocks Oil India Share Price NSE Live 29 April 2024.

हॅशटॅग्स

PSU Stocks(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x