26 May 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फायदाच फायदा! 1,34,984 रुपये फक्त व्याज मिळेल Salary Rs.20,000 | पगार अवघा 20,000 रुपये असेल तरी 1 कोटी रुपये परतावा मिळेल, अशी करा स्मार्ट गुंतवणूक Deepak Nitrite Share Price | मालामाल करणाऱ्या शेअरच्या रेटिंगमध्ये बदल, अत्यंत स्वस्त प्राईसवर खरेदी करता येणार Hot Stocks | संधी सोडू नका! हे 6 शेअर्स अवघ्या 6 दिवसात 44 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, फायदाच फायदा Rekha Jhunjhunwala | श्रीमंत करणारे रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सची लिस्ट, मजबूत ट्रेडिंग व्हॉल्यूम Adani Enterprises Share Price | स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत! शेअर रॉकेट तेजीने वाढणार, स्टॉक 'BUY' करावा?
x

Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell?

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त मंदी पाहायला मिळत आहे. याच चढ-उतारामुळे अदानी समूहाचा भाग असलेल्या काही कंपन्यांचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस या कंपन्याचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड कर होते. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )

अदानी समुहाच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, सेबीने अदानी समूहातील सहा कंपन्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी समूहाचा भाग असलेल्या बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स घसरले होते.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स देखील 4.27 टक्क्यांच्या घसरणीसह 2865.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 0.36 टक्के वाढीसह 2,885 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर स्टॉक 3.28 टक्क्यांच्या घसरणीसह 584.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर सोमवारी 1.93 टक्क्यांच्या घसरणीसह 1765 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी पोर्ट्स स्टॉक सोमवारी 4.47 टक्के घसरणीसह 1261.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 2.54 टक्क्याच्या घसरणीसह 906.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर अदानी एनर्जी सोल्युशन स्टॉक दोन टक्क्यांच्या घसरणीसह 1039.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांनी घसरले होते, आणि शेअर 337.35 रुपये किमतीवर आला होता. तर एसीसी, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स देखील घसरले होते.

अदानी समुहाच्या स्टॉकमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, SEBI ने अदानी समूहाच्या सहा कंपन्यांना व्यवहारांचे उल्लंघन आणि सूचीकरण नियमांचे पालन न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या सहा कंपन्यांना सेबीने जारी केलेली नोटीस हिंडेनबर्ग रिसर्च फर्मने केलेल्या आरोपांच्या तपासणीचा एक भाग आहे. या सहा कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मर कंपन्यां सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 07 May 2024.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x