19 May 2024 9:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

IREDA Share Price | PSU मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये प्रचंड घसरण होतेय, स्टॉक स्वस्तात Buy करावा की Sell?

IREDA Share Price

IREDA Share Price | मागील काही दिवसापासून आयआरईडीए, PFC, REC, यासारख्या इन्फ्रा NBFC कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतर PFC स्टॉक 11 टक्के घसरला होता. तर REC स्टॉक देखील 10 टक्के पडला होता. ( आयआरईडीए कंपनी अंश )

आयआरईडीए स्टॉक सोमवारी 5.5 टक्के घसरणीसह ट्रेड करत होता. आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 2.06 टक्के घसरणीसह 168.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, शुक्रवारी आरबीआयने इन्फ्रा आणि प्रोजेक्ट फायनान्स कंपन्यांसाठी एक परिपत्रक जारी करून काही सूचना दिल्या आहेत. या परिपत्रकात मध्यवर्ती बँकेने बांधकामाधीन पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी राखीव निधीची तरतूद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2012-2013 मध्ये भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी पाहायला मिळत होती, त्यामुळे भारतीय बँकिंग प्रणालीवर जबरदस्त दबाव पडला होता. आता मात्र पुन्हा एकदा भारतात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या थकित कर्जात वाढ होताना दिसत आहे.

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भारत सरकार पायाभूत प्रकल्पांना सहाय्य करत आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन, RBI ने एक नोटीस जारी केली की, जोपर्यंत हे प्रकल्प बांधकाम टप्प्यात आहेत, तोपर्यंत कर्जदारांनी त्याच्या एकूण कर्जाच्या 5 टक्के रक्कम राखीव ठेवणे अनिवार्य करण्यात केले आहे. आणि RBI ने हे प्रकल्प सुरू झाल्यावर राखीव निधीचे प्रमाण 2.5 टक्के पर्यंत कमी करण्यास सांगितले आहे. हे प्रकल्प पुरेशी रोख उत्पन्न करू लागले की, राखीव रक्कम 1 टक्के पर्यंत कमी करता येईल. 2021 मध्ये देखील RBI ने एक परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये एकूण प्रकल्प कर्जावर 0.4 टक्के रक्कम राखीव ठेवण्यास सांगितले होते.

RBI च्या प्रस्तावित परिपत्रकात बँकेने म्हटले आहे की, बँकांनी आणि वित्तीय संस्थांनी कर्जदारांना वित्तपुरवठा केलेल्या प्रकल्पांच्या ताणतणावाचे सतत निरीक्षण करणे आवश्यक आहे. RBI च्या नियमानुसार 15 अब्ज रुपयेपेक्षा जास्त मूल्याच्या प्रकल्पांना वित्तपुरवठा करणाऱ्या कर्जदारांच्या कन्सोर्टियमचे एक्सपोजर किमान 10 टक्के असणे आवश्यक आहे.

आरबीआयने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, एखादा प्रकल्प कधी सुरू केला जाणार आहे, हे कर्जदारांनी आधीच स्पष्ट करावे, कारण प्रकल्प सुरू होण्यास विलंब झाला तर राखीव निधीची तरतूद वाढविण्याचा विचार करावा लागेल. कोणत्याही पायाभूत प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी 3 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला तर त्या कर्जाला तणावग्रस्त कर्ज श्रेणीत वर्गीकृत करावे. या सर्व बाबीवर आरबीआयने बँका आणि वित्तीय संस्थांकडून 15 जूनपर्यंत सूचना मागवल्या आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 07 May 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x