27 November 2022 5:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

Multibagger Mutual Funds | लॉटरी लागली, या म्युचुअल फंडाने 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 9 कोटी रुपये परतावा दिला, योजना नोट करा

Multibagger Mutual Fund

Multibagger Mutual Funds | आजच्या काळात सर्वांना अशा सुरक्षित आणि जोखीम विरहीत ठिकाणी गुंतवणूक करायची असते,जिथून ते चांगला नफा कमवू शकतील. बचत आणि गुंतवणुकीसोबतच, तुम्ही कर सवलतीचा लाभ घेऊन म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. त्यातून दीर्घकाळात तुम्ही करोडो रुपयांचा परतावा कमवू शकता. गुंतवणूक बाजारात अशा अनेक योजना आहेत ज्यात कमी जोखीम असून त्यातून भरघोस परतावा कमावत येऊ शकतो. हा परतावा कमी कालावधीत दुप्पट किंवा तिप्पटही असू शकतो.

यापैकी, म्युच्युअल फंडांत इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच ELSS हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय असू शकतो. ELSS मध्ये गुंतवणूकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करसवलत मिळवता येते. ह्या योजनेत दीर्घकालीन गुंतवणुक केल्यास मोठा निधी तयार करता येतो. आज आपण या लेखात अश्याच एका गुंतवणूक योजनेची माहिती घेणार आहोत ज्यात गुंतवणूक करून तुम्ही करोडो रुपयेचा परतावा कमवू शकता. आपण चर्चा करत आहोत HDFC Tax Saver Fund बद्दल. ह्या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना खूप कमी काळात भरघोस परतावा देऊन करोडपती केले आहे.

एचडीएफसी टॅक्ससेव्हर फंड :
31 मार्च 1996 रोजी HDFC टॅक्ससेव्हर फंड लाँच करण्यात आला होता. HDFC टॅक्ससेव्हर फंड रेग्युलर ग्रोथ ऑप्शन जवळपास 26 वर्षांपासून बाजारात आपल्या गुंतवणूकदारांना पैसे कमावून देत आहे. या म्युचुअल फंडाने 31 मार्च 2022 पर्यंत SIP गुंतवणुकीवर 21.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. HDFC टॅक्ससेव्हर म्युच्युअल फंडमध्ये सुरू झाल्यापासून 31 मार्च 2022 पर्यंत दरमहा 10,000 हजारांची नियमित SIP गुंतवणूक केली असती तर त्यावर 9.39 कोटी रुपये परतावा मिळाला असता. आणि एकरकमी गुंतवणुकीवर 26 वर्षांत एकूण 31.20 लाख रुपये परतावा मिळाला असता.

ICICI बँक, HDFC बँक लि, SBI , भारती एअरटेल लि. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. या म्युचुअल फंडाच्या सर्वात मोठ्या होल्डींग आहेत. या म्युचुअल फंडाचे देशांतर्गत स्टॉकमध्ये 95.52 टक्के एक्सपोजर असून त्यापैकी 84.71 टक्के गुंतवणूक लार्ज-कॅप कंपन्यामध्ये, 7.56 टक्के गुंतवणूक मिड-कॅप स्टॉकमध्ये आणि 3.25 टक्के गुंतवणूक स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये गुंतलेली आहे.

ELSS मध्ये गुंतवणूक कशी करावी?
ELSS मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे KYC आहे. सर्व प्रथम तुम्हाला बँक चेक सह HDFC म्युचुअल फंडच्या शाखा कार्यालय किंवा फंड हाउसच्या रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन अर्ज सबमिट करावा लागेल. म्युच्युअल फंड हाऊसच्या वेबसाइटद्वारे किंवा एग्रीगेटर्सद्वारे तुम्ही या ELSS मध्ये ऑनलाइन माध्यमातूनही गुंतवणूक करू शकता. जेव्हा तुम्ही ELSS मध्ये गुंतवणूक कराल तेव्हा तुम्हाला एक फोलिओ क्रमांक दिला जाईल, ह्या पोर्टफोलिओ क्रमांकाच्या मदतीने तुम्ही ELSS योजनेत सहज गुंतवणूक करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Mutual fund scheme of HDFC Tax Saver ELLS fund for long term investment on 28 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x