
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 272 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण रेल्वे विभागाकडून 239 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, दक्षिण रेल्वेच्या सेलम विभागा अंतर्गत जोलारपेटाई जंक्शन ते इरोड जंक्शनपर्यंत स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम प्रदान करण्याचे कॉन्ट्रॅक्ट आरव्हीएनएल कंपनीला मिळाले आहे. या कामाची पूर्तता पुढील 12 महिन्यांत करायची आहे. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.00 टक्के वाढीसह 276.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आरव्हीएनएल कंपनी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल 17 मे रोजी जाहीर करणार आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 6.2 टक्के घट झाली होती. आणि वार्षिक आधारावर कंपनीचा नफा 382.4 कोटी रुपयेवरून 358.6 कोटी रुपयेवर आला होता. एंजेल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉक गुंतवणूकीच्या दृष्टीने आकर्षक वाटत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 290-300 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअर्स 120 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,127.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअर्स 22 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.