
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स या सरकारी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 170 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. कंपनीची ऑर्डर बुक मजबूत असून कंपनीचा व्यावयाय वाढीचा दृष्टिकोन देखील मजबूत आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश )
जागतिक ब्रोकरेज हाऊस UBS ने हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 45 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक 0.63 टक्के वाढीसह 4,100.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
UBS फर्मने हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला असून तज्ञांनी शेअरची टार्गेट प्राइस 3600 रुपयेवरून वाढवून 5200 रुपये केली आहे. 13 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3921 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही सध्याच्या किंमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 33 टक्के पस्तावा सहज मिळू शकतो. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 3.6 टक्क्यांच्या वाढीसह 4,065 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते.
मागील 1 वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 170 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 टक्के वाढली आहे. तर 2024 या वर्षात कंपनीचे शेअर्स 45 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील एका आठवड्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 9 टक्के परतावा कमावून दिला आहे.
UBS फर्मच्या तज्ञांच्या मते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये 4 पट अधिक वाढ अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष 2024-28 दरम्यान कंपनीच्या ऑर्डर बूकचा आकार 5.3 लाख कोटी रुपये होऊ शकतो. सध्या या कंपनीकडे 1.29 लाख कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स आहेत. पुढील काही वर्षांत कंपनीच्या निर्यात व्यवसायात देखील वाढ अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष 2023-27 दरम्यान कंपनीच्या उत्पादन उत्पन्नात 25 टक्के वार्षिक वाढ पाहायला मिळू शकते. आर्थिक वर्ष 2025-27 मध्ये कंपनीचा EPS 4 टक्के ते 11 टक्के पर्यंत वाढू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.