11 April 2021 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आरोग्यमंत्र्यांनी दिली लॉकडाऊनबाबत प्राथमिक माहिती | अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे आंबे खाल्ल्यावर मुलं होतात असे बोलणाऱ्यांनी संकटाच्या काळात समाजाची दिशाभूल करु नये कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक - योगी आदित्यनाथ देशात रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लोकांची वणवण | पण गुजरातमध्ये भाजप कार्यालयात स्टॉक परमबीर सिंह अडचणीत | राज्य सरकारने माजी पोलिस आयुक्तांचा तपास IPS संजय पांडेंकडे सोपवला उद्या मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यास त्यालाही फडणवीस विरोध करणार का? पंढरपूर पोटनिवडणूक | राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा | भाजपविरोधात प्रचारही करणार
x

स्वतःविरुद्धच्या न्यायालयातील दाव्याला देखील किरीट सोमैय्या यांनी 'वसुली' संबोधलं

BJP leader Kirit Somaiya, CM Uddhav Thackeray

मुंबई, ३ एप्रिल: सध्या सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA आणि राज्य ATS करत आहेत. त्यासंबंधित विषय न्यायालयात देखील असून त्याबाबतीत पुरावे गोळा करण्याचं देखील काम चौकशी यंत्रणांकडून सुरु आहे. सचिन वाझे प्रकरणात ज्या आर्थिक घडामोडी समोर आल्या आहेत त्याचा देखील तपास अजून सुरु आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांवर आरोप करणं सुरु ठेवलं आहे. धक्कादायक म्हणजे सहज ऑनलाईन उपलब्ध होणारी कागदपत्र दाखवून आपण घोटाळा सिद्ध केल्याचं ते स्वतःच ठरवत आहेत. कोणतीही गोष्ट सिद्ध कशी होते याची त्यांना अजून कल्पना नसल्याचं दिसतंय. मात्र आता त्यांच्यावर शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी १०० कोटींचा मानहानीचा खटला न्यायालयात दाखल केला आहे. मात्र न्यायिक खटल्यातून मागितलेल्या न्यायाला देखील त्यांनी थेट ‘वसुली’ असं संबोधलं आहे. याचिका कर्त्यांनी हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यास सोमैयांच्या अडचणी वाढू शकतात.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत सचिन वाझे जेलमध्ये असल्याने उद्धव ठाकरेंनी बहुतेक माझ्याकडून १०० कोटी वसूल करायला सांगितलं असल्याचा आऱोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले आहेत की, “सचिन वाझे जेलमध्ये बंद आहे, त्यामुळे त्याच्याकडून येणारे १०० कोटी मिळणार नाहीत म्हणून बहुतेक उद्दव ठाकरेंनी वायकरांना यावेळी सोमय्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून १०० कोटी वसूल करायला सांगितलं. अशा धमक्यांना आम्ही भिक घालत नाही”. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारचे, सचिन वाझेसह सगळे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असाही इशारा दिला आहे.

 

News English Summary: Kirit Somaiya tweeted that since Sachin Vaze is in jail, Uddhav Thackeray has mostly asked me to recover Rs 100 crore. He said, “Sachin Vaze is lodged in jail, so he will not get Rs 100 crore from him, so most of the time Uddhav Thackeray sent a notice to Vaikar asking him to recover Rs 100 crore from him.

News English Title: BJP leader Kirit Somaiya allegation on CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x